
वास्तुशास्त्र हे प्रामुख्याने सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा या दोन घटकांवर काम करतं. हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, किंवा नकारात्मक ऊर्जा वाढते, तेव्हा तुमच्या आयुष्यात विविध समस्या निर्माण होऊ शकतात. आज आपण स्वयंपाक घरातील वस्तुशास्त्राबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. वास्तुशास्त्रामध्ये स्वयंपाक घराला विशेष स्थान आहे. कारण कोणत्याही घरात तेथील स्वयंपाक घर किंवा किचन ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत असतो. आपण स्वयंपाक घरात जेवण बनवतो. वास्तुशास्त्रानुसार जेवण ज्या पद्धतीने बनवलं असेल तशी ऊर्जा तुमच्या घरात निर्माण होते. या ऊर्जेचा परिणाम हा घरातील कुटुंबप्रमुखासह सर्वांवरच होत असतो. जर घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली तर परिणाम देखील सकारात्मकच होतो, आणि जर नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असेल तर त्याचा परिणाम देखील नकारात्मकच होतो. त्यामुळे स्वयंपाक करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
काय काळजी घ्यावी?
वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक करताना कधीही पायात चप्पल घालून स्वयंपाक करू नये. अनेकाना पायात चप्पल घालून स्वयंपाक करण्याची सवय असते. हा अन्नपूर्णा मातेचा अपमान समजला जातो. यामुळे घरात कधीही बरकत राहत नाही. तसेच तुम्ही जो स्वयंपाक तयार केला आहे, त्यामधून सकारात्मक ऊर्जेऐवजी नकारात्मक ऊर्जा तयार होते. घरात आजारपण वाढतात असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. त्यामुळे स्वयंपाक करताना कधीही पायात चप्पल घालू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं.
विचार
तसेच स्वयंपाक करताना मनात कधीही वाईट विचार आणू नयेत, स्वयंपाक करताना जर तुमच्या मनात नकारात्मक विचार असतील तर त्याचा परिणाम तुम्ही जो स्वयंपाक बनवणार आहात, त्यावर देखील होतो. जर तुम्ही जेवण बनवताना सकारात्मक विचार ठेवले तर तुमच्या घराची भरभराट होते, असं वास्तुशास्त्र सांगतं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)