घराचा मुख्य दरवाजा आकर्षित असावा म्हणून करताय ‘हे’ काम, तर जाणून घ्या काय होतील परिणाम
आपलं घर स्वच्छ, सुंदर आणि आकर्षित दिसावं म्हणून प्रत्येक जण काही ना काही नवीन प्रयोग करत असतो. पण असे काही 4 झाडे आहेत, ते कधीच घराच्या मुख्य दरवाजा समोर नसावेत. ज्यामुळे घरात नकारात्मत ऊर्जा प्रवेश करत

वास्तुशास्त्रानुसार, घराच्या मुख्य दरवाजातूनच घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. त्यामुळे घराच्या मुख्य दरवाजाभोवती असलेल्या वस्तू, झाले आणि वनस्पतींचा घराच्या वातावरणावर आणि आर्थिक स्थितीवर परिणाम होतो. काही झाडे अशी आहेत जी तुमच्या घरात सकारात्मकता आणतात. तर काही झाडे अशी आहेत, ज्यामुळे घरात नकारात्मक उर्जा प्रवेश करते.
काही झाडे अशी असतात जी नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात, ज्यामुळे तुमच्या घराच्या वातावरणावर वाईट परिणाम होतो. घरात सतत भांडणे होतात, आर्थिक समस्या निर्माण होतात. आरोग्याच्या समस्या उद्भवतात, म्हणून वास्तुशास्त्रात काही झाडांचा उल्लेख केला आहे, जी घराच्या मुख्य दरवाजाजवळ लावू नये असा सल्ला देण्यात आला आहे, ही झाडे कोणती आहेत? आणि वास्तुशास्त्र काय सांगते? आज आपण याबद्दल जाणून घेऊ…
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कॅक्टससारखे काटेरी झाडे लावणे अशुभ मानले जाते. काटे नकारात्मक ऊर्जा आणि तणाव आकर्षित करतात. यामुळे तुमच्या घरात भांडणे होऊ शकतात आणि आर्थिक अडचणी वाढू शकतात. मनी प्लांट किंवा तुळशीसारखे शुभ रोपे मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावावेत. ज्यामुळे घरात आनंदी वातावरण राहतं.
बोन्साय वृक्ष: झाड कितीही जुने झाले तरी ते तसेच राहते. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असे झाड लावणे अशुभ मानले जाते. कारण ते तुमच्या प्रगतीत अडथळे निर्माण करते. तुमच्या आर्थिक प्रगतीत अनेक प्रकारच्या समस्या येतात.
वास्तुशास्त्रानुसार, तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कधीही वाळलेली झाडे असू नयेत, कारण अशी झाडे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात. यामुळे तुमच्या घरात आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ नेहमीच हिरवीगार झाडे असावीत.
जर तुम्ही तुमच्या घराभोवती अशी झाडे लावली तर या झाडांची मुळे मोठी होऊ शकतात आणि तुमच्या घरासाठी धोका बनू शकतात. असेही मानले जाते की ही झाडे तुमच्या घरात सकारात्मक उर्जेचा प्रवाह रोखतात.
