दूध वारंवार उतू जातंय? दुर्लक्ष केलं तर तिजोरी होऊ शकते रिकामी!

जर तुमच्या देखील घरात सतत- दूध उतू जात असेल तर होईल मोठं नुकसा. आताच जाणून घ्या यामागील कारण. अन्यथा होईल तिजोरी रिकामी.

दूध वारंवार उतू जातंय? दुर्लक्ष केलं तर तिजोरी होऊ शकते रिकामी!
| Updated on: May 22, 2026 | 3:34 PM

Kitchen Vastu: घरात वारंवार दूध उतू जाऊन गॅसवर किंवा जमिनीवर सांडत असेल तर वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार ते केवळ निष्काळजीपणाचे लक्षण मानले जात नाही. अशा घटना मानसिक तणाव, आर्थिक नुकसान आणि चंद्रदोषाचे संकेत मानले जातात. त्यामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला दिला जातो.

ज्योतिषशास्त्रात दुधाचा संबंध चंद्राशी मानला जातो. चंद्र हा मन, भावना आणि मानसिक शांततेचा कारक ग्रह आहे. त्यामुळे घरात वारंवार दूध उतू जाणे हे कुंडलीतील चंद्र कमजोर असल्याचे संकेत मानले जातात. यामुळे मानसिक अस्थिरता, ताणतणाव आणि निर्णयक्षमता कमी होण्याची शक्यता असते.

Loading...

वास्तुशास्त्रानुसार अग्नीवर ठेवलेले दूध उतू जाणे म्हणजे अग्नी आणि जलतत्त्व यांच्यातील संघर्ष मानला जातो. असे सतत घडत असल्यास घरातील सदस्यांमध्ये वाद-विवाद, मतभेद आणि तणाव वाढू शकतो. छोट्या-छोट्या कारणांवरून घरात कलहाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असते.

आर्थिक अडचणी

दूध हे समृद्धी आणि लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे दूध वारंवार सांडणे हे आर्थिक नुकसानाचे संकेत मानले जातात. येत्या काळात अनपेक्षित खर्च वाढणे किंवा आर्थिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. तसेच गुंतवणुकीत नुकसान होण्याचीही भीती व्यक्त केली जाते. आरोग्याच्या दृष्टीनेही हे अशुभ मानले जाते. विशेषतः घरातील ज्येष्ठ महिला किंवा आईच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो असे मानले जाते. त्यामुळे अशा घटना वारंवार घडत असतील तर आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला दिला जातो.

वास्तुशास्त्रानुसार एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी, मुलाखतीसाठी किंवा प्रवासासाठी घराबाहेर पडताना दूध उतू जाणे हे अडथळ्याचे संकेत मानले जाते. त्यामुळे कामात अडचणी येण्याची शक्यता असते.

उपाय योजना

या नकारात्मक परिणामांपासून बचाव करण्यासाठी काही उपायही सांगितले जातात. प्रत्येक सोमवारी किंवा पौर्णिमेला चांदीच्या भांड्यात पाणी आणि थोडे दूध मिसळून चंद्राला अर्घ्य द्यावे. तसेच सोमवारी दूध, तांदूळ, साखर किंवा पांढऱ्या वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते.

याशिवाय, शुभ कामासाठी बाहेर पडताना दूध सांडल्यास देवासमोर कपूर लावून गोड नैवेद्य दाखवावा आणि क्षमा मागून घराबाहेर पडावे. तसेच स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणे आणि दूध उकळताना पूर्व दिशेकडे तोंड ठेवणेही शुभ मानले जाते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us