AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावताय? या दिशेला बिलकूल लावू नका

Vastu Tips : हिंदू धर्मात वास्तूला फार महत्त्व आहे. घरातील कित्येक गोष्टी वास्तूनुसार केलेल्या योग्य असतात असं म्हणतात, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा घरात कधीच घड्याळ ठराविक दिशेला लावू नका... तर जाणून घ्या कोणती आहे ती दिशा...

Vastu Tips : घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावताय? या दिशेला बिलकूल लावू नका
| Updated on: Aug 26, 2026 | 4:31 PM
Share

वास्तूनुसार अनेक गोष्टी ठरत असतात. वास्तुशास्त्रानुसार, घरातील प्रत्येक वस्तूमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही ऊर्जा असतात. एवढंच नाही तर, वास्तुशास्त्रामध्ये घड्याळासाठी महत्त्वाच्या दिशा दर्शविल्या आहेत. जर घड्याळ योग्य ठिकाणी किंवा योग्य दिशेला ठेवलं नाही, तर घड्याळ नकारात्मक ऊर्जा पसरवतात. आपल्या जीवनात काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. या गोष्टींमुळे आपल्याला वेळेची जाणीव होते. यांच्या मदतीने आपण शुभ आणि अशुभ मुहूर्त जाणून घेऊ शकतो. तसेच, या गोष्टी आपल्या चांगल्या आणि वाईट काळाची नोंद ठेवतात. या गोष्टी म्हणजे घड्याळ आणि दिनदर्शिका.

प्रत्येकाच्या घरी घड्याळ असतं. घड्याळ भूतकाळ आणि भविष्यकाळ दर्शवते. आपल्या जीवनात वेळ ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. वेळ आपल्या जीवनचक्रावर नियंत्रण ठेवतं. प्रत्येकाची वेळ सारखी नसते. प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले आणि वाईट दिवस येतात. काळाचं चक्र अविरतपणे चालू असतं. वेळ कोणासाठीही थांबत नाही, परंतु जर आपण शास्त्रानुसार वागलो, तर आपण आपली वेळ अधिक मजबूत करू शकतो. वास्तुशास्त्राच्या नियमांचे पालन करून आपण आपले जीवन अधिक चांगले बनवू शकतो.

वास्तूच्या नियमांनुसार, आपल्या घरातील भिंतीवर लावलेले घड्याळ एक अत्यंत महत्त्वाचा संकेत देते. जर घड्याळ योग्य दिशेला आणि योग्य ठिकाणी लावलं असेल, तर ते आपल्या जीवनात अनेक शुभ फळे आणते. जर तुम्ही वास्तूच्या नियमांचे पालन करून घड्याळ आणि दिनदर्शिका योग्य दिशेला लावली, तर तुम्हाला स्वतःलाच चांगले बदल अनुभवायला मिळतील आणि तुमच्या जीवनातील समस्या सुटत असल्याचे जाणवेल.

घड्याळाचा आकार: घड्याळाचा आकार गोल किंवा लंबवर्तुळाकार असल्यास ते उत्तम मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार, कोनदार आणि टोकदार वस्तू नकारात्मक ऊर्जेचा स्रोत मानल्या जातात. त्यामुळे घड्याळ चौकोनी नसावे.

देवतेचे चित्र: घड्याळावर देवतेचे चित्र नसावे. देवाची पूजा केली जाते. चित्रांवर हार अर्पण केले जातात. धूप जाळला जातो. पण जर घड्याळावर देवाचे चित्र असेल, तर त्यावर धूळ साचते. हा देवाचा अपमान आहे.

वास्तुशास्त्रानुसार, बंद घड्याळ भिंतीवर कधीही ठेवू नये. त्याचे परिणाम अशुभ असतात. घड्याळ अचूक वेळेवर लावलं पाहिजे. वास्तु नियमांनुसार, बंद घड्याळ दुर्दैव आणतं. ज्या घरात घड्याळ मागे चालते, तेथील लोक प्रत्येक कामात मागे पडतात. त्यांची प्रगती होत नाही.

घड्याळाची योग्य दिशा: वास्तुशास्त्रानुसार, घड्याळ कधीही दक्षिण दिशेला ठेवू नये. दक्षिण दिशा ही मृत्यूची दिशा मानली जाते. या दिशेला भिंतीवर घड्याळ लावल्याने दुर्दैव ओढवते. या दिशेला घड्याळ लावल्यास, त्याकडे पाहताना व्यक्तीचे तोंड दक्षिणेकडे असते, असे मानले जाते. हे अशुभ मानले जाते.

दक्षिण दिशा ही स्थिरतेची दिशा मानली जाते. त्यामुळे, येथे काळाचे प्रतिबिंब दाखवणाऱ्या वस्तू ठेवल्या जात नाहीत. यामुळे घरातील सदस्यांच्या प्रगतीच्या संधींना अडथळा येतो आणि घरप्रमुखाच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो, घड्याळ नेहमी पूर्व किंवा उत्तर भिंतीवर लावावे. उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते.

Follow Us
कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा...
MLC Election Results 2026: कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा डंका; पाहा A टू Z
मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
Pradip Purnekar Case: मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी,
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी, सतीश चव्हाण पिछाडीवर
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या नेत्याचं विधान
राजकीय मतभेद बाजूला! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार?
राजकीय मतभेद बाजूला! CM फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार? महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण
NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी...
MLC Election Result 2026 Updates : NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी अपडेट समोर
पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच...
Breaking Updates : पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच... अमरावती मतदारसंघात मोठा उलटफेर
अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest...
Marathwada MLC Constituency Election 2026 : अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest अपडेट काय?
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, ST महामंडळ...
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकासमोर...