AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips: जिन्याखाली चुकूनही ठेवू नका या वस्तू, निर्माण होऊ शकतो वास्तूदोष

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोणतीही वस्तू पायऱ्यांखाली ठेवण्यापूर्वी हे लक्षात ठेवले पाहिजे की यामुळे वास्तुदोष निर्माण होणार नाहीत. जाणून घ्या अशाच काही गोष्टींबद्दल ज्या पायऱ्यांखाली अजिबात ठेवू नयेत.

Vastu Tips: जिन्याखाली चुकूनही ठेवू नका या वस्तू, निर्माण होऊ शकतो वास्तूदोष
वास्तूशास्त्रImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jan 26, 2023 | 10:28 PM
Share

मुंबई, वास्तुशास्त्रानुसार (Vastushastra) घरातील प्रत्येक वस्तूचा, प्रत्येक कोपऱ्याचा व्यक्तीच्या आर्थिक, मानसिक आणि शारीरिक स्थितीवर चांगला किंवा वाईट प्रभाव पडतो. अनेकांच्या  घरामध्ये कमी जागा असल्यामुळे, त्या जागेचा पुरेपूर वापर करता यावा म्हणून बऱ्याचदा पायऱ्यांखाली सामान ठेवण्यासाठी जागा केली जाते. वास्तूशास्त्राच्या (Vastu Tips) दृष्टीने जिन्याखाआली काही वस्तू ठेवणे चुकीचे मानले आहे. यामुळे व्यक्तीच्या प्रगतीवर आणि खिशावर वाईट परिणाम होतो. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोणतीही वस्तू पायऱ्यांखाली ठेवण्यापूर्वी हे लक्षात ठेवले पाहिजे की यामुळे वास्तुदोष निर्माण होणार नाहीत. जाणून घ्या अशाच काही गोष्टींबद्दल ज्या पायऱ्यांखाली अजिबात ठेवू नयेत.

या गोष्टी कधीही पायऱ्यांखाली ठेवू नका

वास्तुशास्त्रानुसार पूजा कक्ष, स्नानगृह, स्वयंपाकघर इत्यादी कधीही पायऱ्यांखाली बांधू नये, असे केल्याने वास्तुदोष निर्माण होतो.

शूज ठेवू नका

वास्तुशास्त्रानुसार, शूज आणि चप्पल कधीही पायऱ्यांखाली ठेवू नयेत. त्यामुळे आर्थिक स्थिती बिकट होते.

नळाचे पाणी

जर तुम्ही पायऱ्यांखाली पाण्याचा नळ बसवत असाल तर नेहमी लक्षात ठेवा की पाणी विनाकारण वाहू नये. यामुळे घरात पैसा कधीच टीकणार नाही.

डस्टबिन ठेवू नका

वास्तुशास्त्रानुसार डस्टबिन कधीही जिन्याखाली ठेवू नये. असे केल्याने वास्तूदोष निर्माण होतो.

फॅमिली फोटो टाकू नका

वास्तुशास्त्रानुसार, कौटुंबिक फोटो कधीही पायऱ्यांखाली ठेवू नयेत. असे केल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद वाढतील.

कोणत्या दिशेला जिना बनविने शुभ आहे

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये जिना बनवण्याची सर्वोत्तम दिशा दक्षिण-पश्चिम दिशा मानली जाते. याशिवाय पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारा जिना बनवता येतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी