Vastu Tips : या तीन गोष्टी चुकूनही घराच्या छतावर ठेवू नका, जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगतं?

एखाद्या कुटुंबाला सतत आर्थिक अडचणी येत असतील, कर्ज झालं असेल, कर्ज फिटत नसेल तर त्यासाठी वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगितलेले आहेत. त्यातीलच काही उपयांबाबत आज आपण जाणून घेऊयात.

Vastu Tips :  या तीन गोष्टी चुकूनही घराच्या छतावर ठेवू नका, जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगतं?
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: May 10, 2025 | 9:50 PM

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. घर बांधताना ते कसं बांधावं, घराचं स्वयंपाक घर कोणत्या दिशेला असावं? बेडरूम कोणत्या दिशेला असावी? बाथरूम कोणत्या दिशेला असावं? इथपासून ते घरातील प्रत्येक वस्तू कोणत्या दिशेला ठेवावी इथपर्यंत वास्तुशास्त्रात मार्गदर्शन करण्यात आलं आहे. जर तुमचं घर आणि घरातील वस्तू या वास्तुशास्त्रच्या नियमांप्रमाणे ठेवलेल्या असतील तर तुमच्या घरात सुखशांती आणि समुद्धी येते असं मानलं जातं. मात्र जर तुमचं घर हे वास्तुशास्त्रात सांगितलेल्या नियमांप्रमाणे नसेल तर तुमच्या आयुष्यात अडचणी येऊ शकतात.

एखाद्या कुटुंबाला सतत आर्थिक अडचणी येत असतील, कर्ज झालं असेल, कर्ज फिटत नसेल तर त्यासाठी वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगितलेले आहेत. त्यातीलच काही उपयांबाबत आज आपण जाणून घेऊयात, अशा काही वस्तू असतात ज्या अयोग्य ठिकाणी ठेवल्या तर भविष्यात त्याचा मोठा फटका हा तुम्हाला बसू शकतो. जाणून घेऊयात वास्तुशास्त्र काय सांगतं ते.

तुटलेलं फर्निचर – अनेक लोकांना सवय असते, घरातील खराब झालेलं फर्निचर, तुटलेला पलंग, खुर्ची पंखा हे घराच्या छतावर टाकून दिलं जातं. मात्र वास्तुशास्त्रामध्ये असं करणं अशुभ मानलं गेलं आहे. यामुळे तुम्हाला आर्थिक अडचणी येतात. तुम्ही कर्जबाजारी होऊ शकतात. घरात शातंता राहत नाही.

वाळलेले झाडं – अनेक जण आपल्या घरात विविध प्रकारच्या वनस्पती लावतात, मात्र जेव्हा ते झाडं वाळून जातं, तेव्हा ते घराच्या छतावर फेकलं जातं. यामुळे देखील तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. हिरवं झाड हे सकारात्मक ऊर्जेचा स्त्रोत मानलं जातं. तर सुखलेलं झाडं हे नकारात्मक ऊर्जेचं प्रतिक मानलं जातं त्यामुळे असं झाडं कधीच छतावर ठेऊ नका असं वास्तुशास्त्र सांगतं.

गंजलेलं सामान – गंज लागलेल्या सामानाला नकारात्मक उर्जेचं प्रतिक मानलं गेलं आहे, त्यामुळे असं सामान तुमच्या घराच्या छतावर ठेवू नका असं वास्तुशास्त्र सांगतं. यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं.

Follow Us