Vastu Tips : दिवाळीच्या दिवशी करा हे पाच सोपे उपाय, नशीब नक्की चमकणार, तिजोरी धनाने भरून जाणार

दिवाळी हा प्रकाश आणि आनंदाचा उत्सव असतो, आज आपण अशा पाच सोप्या उपायांबाबत माहिती करून घेणार आहोत, जे उपाय दिवाळीच्या दिवशी केल्यास घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होऊन, लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो.

Vastu Tips : दिवाळीच्या दिवशी करा हे पाच सोपे उपाय, नशीब नक्की चमकणार, तिजोरी धनाने भरून जाणार
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 09, 2025 | 9:17 PM

दिवाळी हा प्रकाश आणि आनंदाचा उत्सव असतो, हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी, प्रत्येक जण दिवाळी सणाची अतुरतेनं वाट पाहत असतो. दरवर्षी कार्तिक महिन्यामध्ये दिवाळीचा हा सण येतो. या वर्षी वीस ऑक्टोबरपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान गणेश यांची पूजा केली जाते. वास्तुशास्त्रानुसार दिवाळीच्या दिवशी काही सोपे उपाय केल्यास घरातील आर्थिक समस्या दूर होतात, लक्ष्मी मातेचं घरात आगमन होतं. लक्ष्मी मातेच्या कृपेनी घरात सुख, समृद्धी येते. अशाच काही उपायांबाबत आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

दिवाळीच्या दिवशी सकाळी घराची स्वच्छता केल्यानंतर संपूर्ण घरात कच्च दूध, केशर, हळद आणि गंगाजल यांचं मिश्रण करून संपूर्ण घरात शिंपडायला पाहिजे, यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते.

दिवाळीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाला आंबा आणि झेंडूंच्या फुलांपासून बनवलेलं तोरण बांधावं, आंब्यांच्या पानांचं तोरण हे खूप शुभ मानलं जातं, त्यामुळे घरातून नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरात सुख शांती येते.

दिवाळीच्या दिवशी तुमच्या घरातील पूर्वजांच्या नावाने काही धान्य, दूध आणि मिठाई दान करावी, त्यामुळे पित्रांना समाधान लाभतं, तसेच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहतो.

दिवाळीच्या दिवशी सायंकाळच्या वेळी महादेवाच्या मंदिरामध्ये शिवलिंगासमोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावला पाहिजे, वास्तुशास्त्रानुसार दिवाळीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात दिवा लावल्यानं घरातील पितृदोष दूर होतो, घरात शांतता राहते.

दिवाळीच्या दिवशी घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी तुम्ही जेव्हा सकाळी घराची साफ सफाई करता, तेव्हा त्या पाण्यामध्ये थोडसं मीठ टाकलं पाहिजे, त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, वास्तुदोष दूर होतो,  असं मानलं जातं. नकारात्मक ऊर्जा नष्ट झाल्यामुळे घरात सूख शांती येते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)