Vastu Tips : तुमच्याही घरात आहे शंख? मग हे चार नियम पाळाच, तिजोरी पैशांनी भरून जाईल

हिंदू धर्मामध्ये शंखाला खूप महत्त्व आहे, प्रत्येक पूजेसाठी शंखाची गरज असते. शंखाशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. मात्र तुम्ही जर शंख घरात ठेवणार असाल तर त्याचे काही नियम आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Tips : तुमच्याही घरात आहे शंख? मग हे चार नियम पाळाच, तिजोरी पैशांनी भरून जाईल
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 06, 2025 | 6:51 PM

हिंदू धर्मामध्ये शंखाचं विशेष महत्त्व आहे. पूजेपासून ते सर्व प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये शंख नाद हा खूपच शुभ मानला जातो. असं मानलं जातं की शंख हा समुद्र मंथनामधून निर्माण झाला आहे. शंख हे भगवान विष्णूचं सर्वात प्रिय वाद्य आहे. त्यामुळे भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांच्या पूजेमध्ये शंखाचं विशेष महत्त्व आहे. मात्र खूप थोड्या लोकांना हे माहिती असतं की घरात शंख ठेवण्याचे देखील काही नियम आहेत, वास्तुशास्त्रानुसार हे नियम जर पाळले गेले नाहीत तर तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो, घरात अनेक अडचणी येऊ शकतात, चला तर मग जाणून घेऊयात शंख घरात ठेवण्याचे नेमके काय आहेत नियम त्याबद्दल?

घरात शंख ठेवण्याची योग्य दिशा

वास्तुसास्त्रानुसार घरात शंख ठेवण्याची सर्वात योग्य दिशा ही ईशान्य कोण अर्थात उत्तर पूर्व दिशा ही असते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की शंख हा नेहमी तुम्ही जिथे पूजा करणार आहात तिथे, किंवा तुमच्या देवघरातच ठेवावा, इतर कुठेही शंख ठेवू नये. जर तुमच्या देवघरात शंख असेल आणि तो जर योग्य दिशेला ठेवला असेल तर तुमच्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते, घरात सुख शांती आणि समृद्धी येते.

शंखाची पवित्रता

शंख हा नेहमी स्वच्छ जागी ठेवावा, तसेच प्रत्येक दिवशी पूजेच्यावेळी शंखाची देखील स्वच्छता करावी, त्याच्यावर धूळ बसू देऊ नये. शंखाला स्वच्छ पाण्याने धुवावे आणि पुन्हा त्याच्या जागी ठेवावे. शंखाची दररोज पूजा केल्यास सदैव तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा राहते.

शंखाला जमिनीवर ठेवू नका

जर तुमच्याही घरात शंख असेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा शंखाला चुकूनही जमिनीवर ठेवू नका, शंखाला नेहमी एखाद्या स्वच्छ कपड्यावर किंवा एखाद्या छोट्या स्टॅन्डवर ठेवा. तसेच शंख कधीही रिकामा ठेवू नका, त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवा, तुमच्या घरात सदैव सकारात्मक ऊर्जा राहील.

दोन शंख

शक्यतो घरात दोन शंख असावेत, एक पूजेसाठी आणि दुसरा ध्वनीसाठी शंखनाद हा भगवान विष्णूला खूप प्रिय आहे, त्यामुळे पूजेच्यावेळी शंख नाद करावा मात्र त्यासाठी पूजेचा शंख वापरू नये, यासाठी घरात दोन शंख ठेवावेत, असं वास्तुशास्त्र सांगतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)