
वास्तुशास्त्रानुसार घर बांधताना तत्वांचा आणि दिशांचा सुसंवाद असावा. जर वास्तुनुसार असे झाले नाही तर घरात वास्तुदोष येतो. घरात वास्तुदोष आला तर त्याचे खूप वाईट परिणाम घरातल्या व्यक्तींवर तसेच कामांवर होतो. अशाने आर्थिक नुकसान देखील होत असते. वास्तुदोषामुळे घरात मानसिक आणि धार्मिक कलह निर्माण होऊ लागतात. याशिवाय घरात अशांतता निर्माण होते.
वास्तुदोषाचे कारणे?
आपल्या घरातील स्वयंपाकघर, शौचालय, बेडरूम, देवघर या महत्वाच्या गोष्टी योग्य दिशेला न बांधल्याचे सुद्धा ही वास्तुदोषाची प्रमुख कारणे आहेत. अशा तऱ्हेने जेव्हा घर बांधलं जातं तेव्हा तुम्ही वास्तुशास्त्र यांच्या नुसार घराची योग्य रचना विचारून कोणत्या दिशेला काय आले पाहिजे हे जाणून घेणे तितकेच महत्वाचं आहे. त्यात तुम्ही या गोष्टींची काळजी न घेतल्यास तसेच घर उभारले तर वास्तू दोष लागतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वास्तूदोष न लागण्याचे सोपे उपाय सांगत आहोत.
– काही लोकं कोणताही विचार न करता घरात चुकीच्या दिशेला आरसे लावतात अशा वेळी आपण आरसा योग्य ठिकाणी लावला पाहिजे. कारण आरशातून सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा दोन्ही वेगाने वाढतात. त्यामुळे चुकीच्या दिशेला आरसा लावायला विसरू नका.
– घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी घरात पितळ, चांदी किंवा तांबे जसे की श्रीयंत्र किंवा वास्तुयंत्र ठेवावे. घरात पिरॅमिड ठेवल्यास सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. जेव्हा तुम्ही या वस्तू घरात ठेवता तेव्हा त्या योग्य दिशेला ठेवा, असे केल्याने वास्तुदोष दूर होतात.
– आपल्या घरात तुळस, मनी प्लांट किंवा बांबू सारखी रोपे लावा. असे मानले जाते की ही रोपे लावल्याने घरात सकारात्मक उर्जा संचारते. या वनस्पती पूर्व, उत्तर किंवा ईशान्य दिशेला ठेवा. याशिवाय घराला रंग काम करताना भिंतींना प्रकाश आणि मानसिक शांती देणारे रंग निवडा.
– वास्तुदोष दूर करण्यासाठी घरातील निरुपयोगी आणि तुटलेल्या वस्तू ठेवू नका. अशा गोष्टी लवकरात लवकर घरातून काढून टाका. याशिवाय तुमच्या घरातील ईशान्य दिशा स्वच्छ ठेवा. तसेच घरात दररोज अगरबत्ती, धूप लावून कापूर जाळावा असे केल्याने आपल्या घरातील वास्तुदोष मुक्त होतात.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)