
भारतीय संस्कृतीत वास्तुशास्त्राला खूप महत्व आहे. हे एक असे शास्त्र आहे जे घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी मार्गदर्शन करते. तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, पण वास्तुशास्त्र हे घरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर परिणाम करते. यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीत, आनंदात आणि आरोग्यावर प्रभाव असतो. वास्तुशास्त्रात कुटुंबातील पूर्वजांनाही खूप महत्व आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
तुमच्यापैकी अनेक लोक जाणूनबुजून किंवा नकळत पूर्वजांचे फोटो बेडरूममध्ये लावतात. मात्र ते वास्तुनुसार चुकीचे आहे. कारण पूर्वजांचे फोटो चुकीच्या दिशेला लावल्यास नकारात्मक ऊर्जा तयार होते, परिणामी अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे तुम्हाला पूर्वजांचे फोटो लावण्याची योग्य दिशा आणि नियम जाणून माहिती असणे महत्वाचे आहे.
वास्तुशास्त्रानुसार पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण ही सर्वात सर्वात योग्य दिशा आहे. याचे कारण म्हणजे ही दिशा यमाची दिशा मानली जाते. बेडरूमच्या दक्षिण दिशेला फोटो लावल्याने पूर्वज प्रसन्न होतात, त्यामुळे त्यांचे आशीर्वाद कुटुंबाला मिळतात. यामुळे घरात शांती आणि स्थिरता टिकून राहते. तसेच पूर्वजांचे फोटो योग्य दिशेला लावल्यास संकटे कमी होतात आणि घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही.
पुर्वजांचे फोटो बेडरूम, प्रार्थना करण्याचे ठिकाण, किचन, अंगण, बैठकीची खोली किंवा घराच्या मध्यभागी लावू नयेत. यामुळे घरात ताणतणाव, संघर्ष आणि मानसिक अशांतता वाढू शकते. तसेच घरात पूर्वजांचे जास्त असणे चुकीचे आहे. यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर चुकीच्या दिशेला फोटो लावले तर पितृदोष लागण्याची शक्यता असते.
दक्षिण दिशेला फोटो लावल्यानंतर फोटोंभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवावा. पूर्वजांच्या फोटोजवळ जिवंत लोकांचे फोटो लावू नयेत. कारण यामुळे जिवंत लोकांच्या जीवनात अडथळे निर्माण होऊ शकतात. तसेच तुमच्या घराच्या वायव्य दिशेला किचन आणि नैऋत्येला बेडरूम असावे. तसेच बेडरूममध्ये हलका रंग वापरलेला असावा. यामुळे आरोग्य चांगले राहते. तसेच तिजोरी नेहमी उत्तरेकडे असावी कारण ही माता लक्ष्मीची दिशा आहे.