Vastu Tips : आठवड्यातून फक्त एकदा करा हा सोपा उपाय, घरावर होईल पैशांचा वर्षाव
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये वास्तुदोष दूर करण्यासाठी वेगवेगळे उपाय सांगण्यात आले आहेत. आज आपण त्यातीलच एक उपाय जाणून घेणार आहोत. जर तुमच्याही हातात पैसा टिकत नसेल तर या उपायामुळे तुमच्या घरात बरकत येऊ शकते.

वास्तुशास्त्रामध्ये वास्तुदोषाशी संबंधित अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. जर तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण झाला तर तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात. अनेकदा आपल्या सोबत असं देखील होतं की आपण खूप कष्ट करतो, प्रचंड पैसा कमावतो, मात्र तो हातात टिकत नाही. किंवा कधी कधी असं देखील होतं की अकस्मात धनहानी होते. आपल्याकडील सर्व पैसे खर्च होतात. घरात कायम पैशांची तंगी राहते, तुमच्यासोबत असं होऊ नये, घरातील सर्व वास्तुदोष दूर व्हावेत म्हणून वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातीलच काही उपायांबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. वास्तुशास्त्रामध्ये असे काही साधे उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे तुमच्यावर कायम लक्ष्मी मातेचा आशीर्वाद रहातो. आणि सर्व प्रकारची आर्थिक संकट दूर होतात.
वास्तुशास्त्रानुसार घरात जर वास्तुदोष निर्माण झाला असेल तर पैशांशी संबंधित अडचणी तुम्हाला येऊ शकतात, त्यासाठी दर आठवड्याला शुक्रवारी लक्ष्मी मातेची पूजा करण्याचा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे, वास्तुशास्त्रानुसार दर शुक्रवारी लक्ष्मी मातेची पूजा केल्यास घरातील सर्व नकारात्माक शक्तीचा नाश होतो, आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहतो. तुम्हाला घरात कधीही पैशांची तंगी जाणवत नाही.
वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मी मातेला लाल रंग आवडतो, त्यामुळे तुम्ही दर शुक्रवारी लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करताना लक्ष्मी मातेच्या मूर्तीला किंवा प्रतिमेला लाल रंगाच्या गुलाबाचे फूल किंवा माळ अर्पण करू शकता. त्यामुळे घरातील वास्तुदोष नष्ट होतात. तसचे दर शुक्रवारी घराच्या मुख्य दरवाजाबाहेर दोन दिवे लावावेत ज्यामुळे घरात कधीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही.
सोबतच उत्तर दिशेला कुबेराचा फोटो लावावा, उत्तर दिशा ही कुबेराची दिशा असते, त्यामुळे घरात सदैव पैसा टिकून रहातो, घरात बरकत राहते. तुमच्या घरात असलेल्या तिजोरीचं तोंड देखील उत्तर दिशेला असावं, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे, वास्तुशास्त्राशी संबंधित या नियमांचं पालन केल्यास घरात सदैव सुख, शांती राहते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)
