Vastu Tips : अंघोळ केल्यानंतर बाथरुममध्ये ही वस्तू कधीच ठेवू नका, अन्यथा येते आर्थिक संकट

अनेकजण बाथरुममधून बाहेर आल्यानंतर काही वस्तू तशाच ठेवतात. पण ही सवय तुमच्या आर्थिक परिस्थिती बिघडवू शकते. त्यामुळे बाथरुममध्ये ही वस्तू कधीच ठेवू नका.

Vastu Tips : अंघोळ केल्यानंतर बाथरुममध्ये ही वस्तू कधीच ठेवू नका, अन्यथा येते आर्थिक संकट
Image Credit source: Social media
| Updated on: May 17, 2026 | 1:15 PM

Vastu Tips: घरातील मोठी मंडळी अनेकदा बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवू नका, असा सल्ला देताना दिसतात. काहीजण याकडे जुन्या काळातील समज किंवा अंधश्रद्धा म्हणून पाहतात पण वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार यामागे काही महत्त्वाच्या मान्यता सांगितल्या गेल्या आहेत. विशेषतः पाणी, स्वच्छता आणि घरातील ऊर्जा यांचा संबंध लक्षात घेता बाथरूममधील काही सवयी घराच्या वातावरणावर परिणाम करू शकतात असे मानले जाते.

वास्तुशास्त्रानुसार पाण्याचा संबंध समृद्धी, आर्थिक स्थैर्य आणि मानसिक शांततेशी जोडला जातो. त्यामुळे बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवणे हे नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. वास्तुशास्त्रात पाण्याचा थेट संबंध धनाशी जोडला जातो. जसे वाहते पाणी थांबत नाही, तसेच घरात पाण्याशी संबंधित गोष्टींचा प्रभाव आर्थिक स्थितीवर पडतो असे मानले जाते. रिकामी बादली ही अभाव आणि कमतरतेचे प्रतीक मानली जाते.

मान्यतेनुसार, बाथरूममध्ये सतत रिकामी बादली ठेवली तर घरात पैसा टिकत नाही, अनावश्यक खर्च वाढतात आणि आर्थिक अस्थिरता निर्माण होऊ शकते. उलट पाण्याने भरलेली बादली ही घरातील भरभराट, सकारात्मकता आणि समाधानाचे प्रतीक मानली जाते.

घरात वाढू शकतो तणाव

बाथरूम हे घरातील असे ठिकाण मानले जाते, जिथे नकारात्मक ऊर्जा निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. वास्तु तज्ज्ञांच्या मते, रिकामी बादली या नकारात्मक ऊर्जेला आकर्षित करते.

यामुळे घरातील सदस्यांमध्ये चिडचिड, मानसिक तणाव, अस्वस्थता आणि वादविवाद वाढू शकतात. त्यामुळे बाथरूम स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवण्यासोबतच बादली रिकामी न ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

हे 3 छोटे बदल घरात आणू शकतात सकारात्मकता

वास्तुनुसार रात्री झोपण्यापूर्वी बाथरूममधील बादली स्वच्छ पाण्याने भरून ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते असे मानले जाते.

वास्तुशास्त्रात निळा रंग शांतता आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे शक्य असल्यास बाथरूममध्ये निळ्या रंगाची बादली किंवा टब वापरण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते अशी मान्यता आहे.

जर बादली रिकामी ठेवावी लागत असेल तर ती सरळ ठेवण्याऐवजी स्वच्छ धुऊन उलटी ठेवावी असे वास्तुशास्त्रात सांगितले जाते. यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते अशी समजूत आहे.

(डिस्क्लेमर: वरील माहिती सामान्य माहितीच्या आधारावर आहे. याच्या पूर्ण सत्यतेचा दावा केला जात नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Follow Us