Vastu: Vastu : नवीन वर्षात घर घेताय?, वास्तुनियमांकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर…

| Updated on: Dec 27, 2021 | 10:34 AM

वास्तुशास्त्रानुसार टिप्स पाळल्याने अनेक समस्या आपल्यापासून दूर राहतात. वास्तुशास्त्रात अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. यामध्ये घराची दिशा आणि कुठे काय ठेवावे हेही सांगितले आहे. तुम्ही नवीन घर घेण्याचा विचार करत असाल किंवा खरेदी करणार असाल तरीही वास्तूनुसार अनेक गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

Vastu: Vastu  : नवीन वर्षात घर घेताय?, वास्तुनियमांकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर...
वास्तू उपाय
Follow us on

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार टिप्स (Vastu Tips) पाळल्याने अनेक समस्या आपल्यापासून दूर राहतात. वास्तुशास्त्रात अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. यामध्ये घराची दिशा आणि कुठे काय ठेवावे हेही सांगितले आहे. तुम्ही नवीन घर घेण्याचा विचार करत असाल किंवा खरेदी करणार असाल तरीही वास्तूनुसार अनेक गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

घरात वास्तुदोष राहिल्याने जीवनात अनेक संकटे येतात. जीवनात फक्त अपयशच मिळते आणि मानसिक वेदनाही आयुष्यात येतात. अशा स्थितीत वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याचा अवलंब केल्याने घरातील वास्तुदोष दूर होऊन घरात समृद्धी येऊ शकते. नवीन घर घेताना कोणत्या गोष्टी किंवा नियम लक्षात ठेवावेत हे आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

1. वास्तूनुसार घराचे मुख्य द्वार उत्तर दिशेला असल्यास ते शुभ मानले जाते. जर घराचे प्रवेशद्वार उत्तर दिशेला करता येत नसेल तर प्रयत्न करा की त्याची दिशा ईशान्य असावी.

2. वास्तूच्या नियमानुसार घर नेहमी चौकोनी किंवा आयताकृती आकाराचे असावे. जरी तुम्ही जमीन घेत असाल, तर ती चौरस किंवा आयताच्या आकारात असावी. नवीन घरासाठी हे खूप शुभ मानले जाते.

3. वास्तुशास्त्रात सांगितले आहे की, जर स्वयंपाकघर चुकीच्या दिशेने असेल तर तो मोठा दोष आहे. त्यामुळे स्वयंपाकघर आग्नेय दिशेला बनवण्याचा सल्ला दिला जातो. मास्टर बेड रूम पश्चिम दिशेला आणि मुलांची खोली उत्तर-पूर्व दिशेला असावी.

4. घरामध्ये सूर्याचा प्रकाश असणे खूप शुभ असते. तसेच वास्तूनुसार घरामध्ये सकारात्मक ऊर्जा देखील येते. सूर्यास्ताच्या वेळी सूर्यप्रकाश घराच्या प्रवेशद्वारावर पडू नये याकडे लक्ष द्या, कारण ते वास्तूमध्ये चांगले मानले जात नाही.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन हे प्रसिध्द करण्यात आले आहे.)

संबंधित बातम्या : 

ज्योतिष टिप्स: नोकरी मिळण्यात अडचणी येत आहे? मग हे खास उपाय करून पाहा!

रावणाचा वध करण्यापूर्वी भगवान श्रीरामांनी महादेवाला या स्तुतीने केले होते प्रसन्न, शिव रुद्राष्टक स्तोत्राबद्दल जाणून घ्या!