ज्योतिष टिप्स: नोकरी मिळण्यात अडचणी येत आहे? मग हे खास उपाय करून पाहा!

ज्योतिष टिप्स: नोकरी मिळण्यात अडचणी येत आहे? मग हे खास उपाय करून पाहा!
नोकरी

स्थिर जीवन जगण्यासाठी नोकरी खूप महत्वाची आहे. व्यवसाय म्हणून नोकरी निवडणाऱ्यांना एखाद्या संस्थेत चांगली नोकरी मिळावी अशी इच्छा असते. बर्‍याच वेळा लोक नोकरीसाठी खूप धावपळ करतात आणि त्यांना सतत मुलाखतीला सामोरे जावे लागते. खूप मेहनत आणि प्रयत्न करूनही त्यांना नोकरी मिळत नाही.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Dec 26, 2021 | 1:35 PM

मुंबई : स्थिर जीवन जगण्यासाठी नोकरी (Job) खूप महत्वाची आहे. व्यवसाय म्हणून नोकरी निवडणाऱ्यांना एखाद्या संस्थेत चांगली नोकरी मिळावी अशी इच्छा असते. बर्‍याच वेळा लोक नोकरीसाठी खूप धावपळ करतात आणि त्यांना सतत मुलाखतीला सामोरे जावे लागते. खूप मेहनत आणि प्रयत्न करूनही त्यांना नोकरी मिळत नाही. खरे तर सुखी आणि स्थिर जीवन जगण्यासाठी यशस्वी आणि स्थिर नोकरीची गरज असते.

ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीत ग्रहांच्या कमकुवत आणि वाईट स्थानामुळे बऱ्याच वेळा आपल्याला नोकरी लागताना समस्या निर्माण होतात. ज्यांना नोकरी मिळण्यात अडचण येत आहे, त्यांनी ज्योतिषाचीही मदत घ्यावी. दैनंदिन जीवनात काही सोपे उपाय केल्यास नोकरी मिळण्याची शक्यता निर्माण होते आणि जीवनात आनंद येऊ शकतो. आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. जे तुम्हाला नोकरी लागण्यासाठी मदत करू शकतात.

-दररोज सकाळी तांब्याच्या भांड्यात गूळ टाकून सूर्याला जल अर्पण करा. यशस्वी करिअर आणि नोकरीसाठी हे सर्वात प्रभावी ज्योतिषीय उपायांपैकी एक मानले जाते.

-सुंदरकांडच्या ग्रंथात अशी शक्ती आहे. ज्यामुळे मन शांत होते. साहजिकच मन शांत असेल तर तुम्ही ध्येयाकडे अधिक लक्ष देऊ शकाल. त्यामुळे आजपासूनच रोज सुंदरकांड वाचा, कारण ज्योतिष शास्त्रानुसार ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.

-कष्ट करूनही नोकरी मिळत नसेल तर हनुमानजींना प्रसन्न करावे. मंगळवारी 11 वेळा हनुमान चालिसाचा पाठ करा आणि पिवळा सिंदूरही अर्पण करा. तसेच या दिवशी दिवा लावणे देखील तुमच्या करिअरसाठी चांगले राहील. तसेच, हनुमानजींना बेसनाचे लाडू अर्पण करा आणि हा प्रसाद किमान 11 गरीब लोकांना वाटा.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन हे प्रसिध्द करण्यात आले आहे.)

संबंधित बातम्या : 

रावणाचा वध करण्यापूर्वी भगवान श्रीरामांनी महादेवाला या स्तुतीने केले होते प्रसन्न, शिव रुद्राष्टक स्तोत्राबद्दल जाणून घ्या!

पौष महिन्यातील रविवारी या प्रकारे करा सूर्यदेवाची पूजा, धन-समृद्धीची कमतरता होणार नाही!


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें