Vastushastra : फ्रिजवर चुकूनही ठेवू नका या वस्तू, …तर बँक अकाऊंट रिकामं झालचं म्हणून समजा
आपल्या भोवती असलेल्या प्रत्येक वस्तुंचा आपल्यावर परिणाम होत असतो, हा प्रभाव सकारात्मक किंवा नकारात्मक असा दोन्ही असू शकतो, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी या फ्रिजवर ठेवणं टाळल्या पाहिजेत.

वास्तुशास्त्रानुसार आपल्या भोवती घरात किंवा ऑफीसमध्ये ज्या काही गोष्टी असतील त्या प्रत्येक वस्तुंचा किंवा गोष्टींचा आपल्या आयुष्यावर परिणाम होत असतो. आपल्याला हा बदल लक्षात येत नाही, मात्र अशा वस्तुंमुळे आपलं आयुष्य प्रभावीत होत असतं. हा परिणाम पॉझिटिव्ह किंवा निगेटीव्ह असा दोन्ही असू शकतो. त्यामुळे घरात कोणतीही वस्तू आणण्यापूर्वी किंवा ती घरात ठेवताना काळजी घ्यावी, वास्तुशास्त्रात सांगितलेल्या नियमांचं पालन करावं, असं मानलं जातं. आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये फ्रिजचा वापर वाढतो. आजकाल प्रत्येकाच्या घरात फ्रिज असतं. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंडगार पेय मिळण्यासाठी आणी अन्नपदार्थ अधिककाळ ताजे राहावेत, ते खराब होऊ नयेत, म्हणून फ्रिजचा वापर केला जातो. मात्र अनेकांना सवय असते, की ते फ्रिजवर विविध प्रकारच्या वस्तू ठेवतात.
मात्र फ्रिजवर ठेवण्यात आलेल्या काही ठरावीक वस्तू या केवळ फ्रिजच्या मशीनवरीलच ताण वाढवत नाहीत, तर त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते. ज्याचा परिणाम थेट तुमच्या आर्थिक स्थितीवर होतो. एवढंच नाही तर यामुळे तुमचं मानसिक आरोग्य देखील बिघडतं. मन अस्थिर होतं. तसेच आरोग्याच्या देखील काही समस्या निर्माण होतात, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. आज आपण अशाच काही वस्तूंबद्दल जाणून घेणार आहोत.
फ्रिजवर कोणत्या वस्तू ठेवू नयेत?
औषधं – फ्रिजवर चुकूनही औषध ठेवू नयेत. यामागे दोन कारणं आहेत, एक म्हणजे फ्रिजमधून जी उष्णता निघते त्या उष्णतेचा परिणाम हा औषधांवर होतो. त्यामुळे औषधांचं जे केमिकल कंपोजिशन असतं ते खराब होतं. अशी औषध घेणं हे शरीरासाठी खूपच धोकादायक ठरू शकतं. फ्रिजवर ठेवलेल्या औषधांमुळे आजार बरा होण्याऐवजी तो वाढण्याचाच धोका जास्त असतो. तसेच वास्तुशास्त्रानुसार देखील फ्रिजवर औषधं ठेवल्यास घरात वास्तुदोष निर्माण होतो. ज्यामुळे तुमचं मन अस्वस्थ होतं.
विद्युत उपकरण, मोबाईल – फ्रिजवर चुकूनही इतर विद्युत उपकरणं किंवा मोबाईल ठेवू नये. फ्रिजमधून निघणाऱ्या उष्णतेमुळे या वस्तू खराब होण्याच्या धोका असतो. किंवा या उलट देखील घडू शकतं. या विद्युत उपकरणामध्ये बिघाड झाला तर तुमचं फ्रिज देखील खराब होऊ शकतं. तसेच फ्रिज आणि विद्युत उपकरणांमधून निघणाऱ्या लहरी एकत्र आल्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्याचा परिणाम हा तुमच्यावर होतो.
चावी – घर किंवा वाहनाची चावी कधीही फ्रिजवर ठेवू नये. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते, ज्याचा फटका हा थेट तुमच्या आर्थिक स्थितीवर होतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)