AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinayak Chaturthi 2023 : आज विनायक चतुर्थीला जुळून आले आहेत हे पाच शुभ योग, अशा प्रकारे करा बाप्पाची आराधना

Vinayak Chaturthi 2023 सर्व देवतांमध्ये गणेशाला प्रथम पूजनीय मानले जाते. गणेशपूजेशिवाय कोणतेही धार्मिक विधी पुर्ण होत नाही. विनायक चतुर्थीची महिमा शास्त्रात सांगितली आहे.

Vinayak Chaturthi 2023 : आज विनायक चतुर्थीला जुळून आले आहेत हे पाच शुभ योग, अशा प्रकारे करा बाप्पाची आराधना
गणपती बाप्पाImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Aug 20, 2023 | 9:06 AM
Share

मुंबई : भगवान शंकराचा प्रिय श्रावण महिना सुरू झाला आहे. श्रावण मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला आज विनायक चतुर्थी (Vinayak Chaturthi 2023) व्रत आहे. चतुर्थी ही गणपतीला समर्पित असते. विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीची विशेष पूजा केली जाते. गणपतीला विघ्नहर्ता देखील म्हणतात. म्हणूनच या दिवशी गणेशाची विधिवत पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्यांचा अंत होतो. यंदाची विनायक चतुर्थी काही विशेष योग जुळून आल्यामुळे महत्त्वाची आहे.

विनायक चतुर्थीचे महत्त्व

सर्व देवतांमध्ये गणेशाला प्रथम पूजनीय मानले जाते. गणेशपूजेशिवाय कोणतेही धार्मिक विधी पुर्ण होत नाही. विनायक चतुर्थीची महिमा शास्त्रात सांगितली आहे. या दिवशी गणपतीची पूजा केल्याने साधकाला ऐश्वर्य, सुख, समृद्धी आणि वैभव प्राप्त होते. या दिवशी विघ्न दूर करणाऱ्या श्रीगणेशाची आराधना केल्याने सर्व दुःखांचा अंत होतो.

विनायक चतुर्थीला 5 शुभ योग

1. सर्वार्थ सिद्धी योग – 21 ऑगस्ट रोजी सकाळी 05.53 ते 04.22 पर्यंत 2. रवि योग – 21 ऑगस्ट रोजी सकाळी 06.21 ते 04.22 पर्यंत 3. अमृत सिद्धी योग – 20 ऑगस्ट रोजी सकाळी 5.53 पासून दिवसभर राहील 4. साध्य योग – 19 ऑगस्ट रात्री 09.19 ते 20 ऑगस्ट रात्री 09.58 वा. 5. शुभ योग – 20 ऑगस्ट 2023, सकाळी 09.58 ते 21 ऑगस्ट रात्री 10.20 वा.

आज अशा प्रकारे करा बाप्पाची पुजा

विनायक चतुर्थीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर पहाटे उठून स्नान करावे. यानंतर लाल रंगाचे वस्त्र परिधान करून तांब्याच्या पात्राने सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. गणपतीच्या मंदिरात गुळ खोबरं किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवावा. त्यांना गुलाबाचे लाल फूल आणि दूर्वा अर्पण करा आणि ओम गम गणपतये नमः मंत्राचा 27 वेळा जप करा.  गणपती अथर्वशीर्ष पठण करा. त्यानंतर दुपारी गणेशपूजेच्या वेळी आपल्या क्षमतेनुसार पितळ, तांबे किंवा मातीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करावी. संकल्प करून श्री गणेशाची आरती करून मोदक अर्पण करून प्रसाद म्हणून वाटप करावे. असे केल्याने गणपतीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?