Vinayak Chaturthi : आज विनायक चतुर्थी, जाणून घ्या पुजा मुहूर्त आणि शुभ योग

विनायक चतुर्थीला गणेशाची पूजा करून व्रत केल्यास प्रत्येक मनोकामना पूर्ण होते. तसेच भगवान गणेश बुद्धी आणि संयम यांचा आशीर्वाद देतात.

Vinayak Chaturthi : आज विनायक चतुर्थी, जाणून घ्या पुजा मुहूर्त आणि शुभ योग
गणपतीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 10:56 AM

मुंबई : हिंदू दिनदर्शीकेनुसार, विनायक चतुर्थी (Vinayak Chaturthi) हा सण भगवान गणेशाला समर्पित आहे. अमावास्येनंतर येणार्‍या शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी आणि पौर्णिमेनंतर येणार्‍या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. विनायक चतुर्थी व्रत दर महिन्याला येते. यावेळी 23 फेब्रुवारी 2023 रोजी म्हणजेच आज विनायक चतुर्थीचा सण साजरा केला जात आहे. विनायक चतुर्थीला गणेशाची पूजा करून व्रत केल्यास प्रत्येक मनोकामना पूर्ण होते. तसेच भगवान गणेश बुद्धी आणि संयम यांचा आशीर्वाद देतात. विनायक चतुर्थीच्या दिवशी, मध्यान्हकाळात दुपारी गणेश पूजन केले जाते. गणपतीची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त, पूजेची पद्धत जाणून घेऊया.

विनायक चतुर्थी पूजेची वेळ

फाल्गुन, शुक्ल चतुर्थी सुरुवात – 23 फेब्रुवारी, सकाळी 03:24 वाजता समाप्त – फेब्रुवारी 24, 01:33 AM

गणपतीच्या पूजेची वेळ – सकाळी 11:26 ते दुपारी 01:43 पर्यंत.

हे सुद्धा वाचा

विनायक चतुर्थी पूजा विधी

विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. यानंतर गणेशाची आराधना सुरू करा. या दिवसाच्या पूजेत नारळ आणि मोदक यांचा समावेश करावा. याशिवाय पूजेत गणेशाला गुलाबाचे फूल आणि दूर्वा अर्पण करा. धूप, दिवा, नैवेद्य अर्पण केल्यानंतर ‘ओम गं गणपतये नमः’ या मंत्राचा जप करावा. गणपतीची कथा वाचा, आरती करा, पूजेत सहभागी असलेल्या सर्वांना प्रसाद वाटप करा.

विनायक चतुर्थीचे महत्त्व

शास्त्रात असे वर्णन आहे की जे लोकं विघ्न दूर करणारे श्री गणेशाची नित्य पूजा करतात त्यांच्या जीवनातील सर्व संकटे संपतात. विनायक चतुर्थीला सिद्धी विनायक रूपाची पूजा केल्याने संततीशी संबंधित प्रत्येक समस्या दूर होतात. कुटुंबाच्या वाढीसाठी हे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

विनायक चतुर्थी शुभ योग

विनायक चतुर्थीच्या निमित्ताने आज अनेक शुभ योगही बनत आहेत. सर्वार्थ सिद्धी योग दिवसभर राहील. विजय मुहूर्त दुपारी 2.28 ते 3.14 पर्यंत असेल. रवियोग सकाळी 06.52 वाजता सुरू झाला असून 24 फेब्रुवारी 2023 रोजी पहाटे 3.44 पर्यंत राहील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक.
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार.
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?.
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल.
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?.
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.