AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सात हजार किलो शाडूच्या मातीपासून साकारली माऊलीची 35 फूट उंच मूर्ती

पुण्यातील प्रसिद्ध शिल्पकार विनोद येलारपूरकर (Vinod Yelapurkar) यांनी आषाढी एकादशीचे औचीत्त्य साधून  विठू माऊलीची 35 फूट उंच मूर्ती (35 feet Vitthal murti) साकारली आहे. सातारा जिल्ह्मातील वाईजवळील कुडाळ गावात आषाढी एकादशीच्या (Ashadhi ekadashi 2022) दिवशी मूर्ती ठेवण्यात येणार आहे. मागील दोन महिन्यांपासून विनोद येलारपूरकर ही मूर्ती साकारात असून त्याकरिता त्यांना स्टुडिओतील सहा ते सात कलाकार […]

सात हजार किलो शाडूच्या मातीपासून साकारली माऊलीची 35 फूट उंच मूर्ती
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jun 29, 2022 | 10:13 AM
Share

पुण्यातील प्रसिद्ध शिल्पकार विनोद येलारपूरकर (Vinod Yelapurkar) यांनी आषाढी एकादशीचे औचीत्त्य साधून  विठू माऊलीची 35 फूट उंच मूर्ती (35 feet Vitthal murti) साकारली आहे. सातारा जिल्ह्मातील वाईजवळील कुडाळ गावात आषाढी एकादशीच्या (Ashadhi ekadashi 2022) दिवशी मूर्ती ठेवण्यात येणार आहे. मागील दोन महिन्यांपासून विनोद येलारपूरकर ही मूर्ती साकारात असून त्याकरिता त्यांना स्टुडिओतील सहा ते सात कलाकार मदत करत आहेत. सिव्हिइलेक प्रोजेक्ट कंपनीचे संचालक दत्तात्रय भालेगरे व कमलेश भालेगरे यांनी ही मूर्ती तयार करण्याची कल्पना येलारपूरकर यांच्याकडे मांडली होती. त्यानुसार सुबक मूर्ती बनविण्यात आली आहे.

ही मूर्ती बनविण्याकरिता सात हजार किलो शाडूची माती लागली, असे येलारपूरकर यांनी सांगितले. दीड हजार किलो वजनाचा लोखंडी सांगाडा व फायबर वापरण्यात आले. त्यामुळे हवा, पाणी आणि अन्य कोणत्याही वातावरणात मूर्ती खराब होणार नाही. मूर्ती विष्णुरूपात साकारली आहे. मूर्तीच्या उजव्या हातात कमलपुष्प आणि डाव्या हातात शंख आहे. काळ्या पाषाणासारखे रूप या मूर्तीला देण्यात आल्याने ती विलोभनीय दिसत आहे.

महाराष्ट्र राज्य विधानसभासत्तेचं गणित
विधानसभेचे एकूण सदस्य288
दिवंगत सदस्य01
कारगृहात सदस्य02
सध्याची सदस्य संख्या285
एकनाथ शिंदे गटाकडे किती आमदार39
आता सभागृहाची सदस्य संख्या285
बहुमताचा आकडा143
भाजपचं संख्याबळभाजप (106)+शिंदे गट (39)+अपक्ष (27)=172
मविआचं संख्याबळशिवसेना (16)+ राष्ट्रवादी (51)+ काँग्रेस (44)= 111
शिंदे गट भाजपसोबत न गेल्यास भाजपकडे किती संख्याबळ?भाजप (106)+ अपक्ष (27) = 133
———

विविध माध्यमांत काम

विनोद येलारपूरकर यांनी शिल्पकलेचे शिक्षण सर जे जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये घेतले आहे. 2004 पासून व्यावसायिक शिल्पकार, मूर्तिकार म्हणून ते कास करत आहेत. त्यांनी दीडशेहून अधिक गणेशमूर्ती साकारल्या आहेत. विविध शिल्पं भितिचित्रं त्यांनी केली आहेत. थ्रीडी, धातू, लाकूड,फायबर अशा विविध माध्यमांत ते काम करतात.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...