Pandharpur wari 2022: माऊलीच्या पालखीचे लोणंदसाठी तर तुकोबारायांच्या पालखीचे बारामतीसाठी प्रस्थान

21 जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने (Dnyaneshwar maharaj palkhi) आळंदीहून प्रस्थान ठेवले. तब्बल दोन वर्षांनंतर पालखी सोहळा (Pandharpur wari 2022) साजरा होत असल्याने वैष्णवांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय. जवळपास चार लाख वारकरी यंदा माऊलीच्या पालखीत सामील झाले आहेत. जेजुरी येथे खंडेरायाच्या भेटीनंतर  पालखीचा मुक्काम काल वाल्हे येथे होता. तर, आज पालखी वाल्हे येथून प्रस्थान करेल. […]

Pandharpur wari 2022: माऊलीच्या पालखीचे लोणंदसाठी तर तुकोबारायांच्या पालखीचे बारामतीसाठी प्रस्थान
नितीश गाडगे

|

Jun 28, 2022 | 9:38 AM

21 जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने (Dnyaneshwar maharaj palkhi) आळंदीहून प्रस्थान ठेवले. तब्बल दोन वर्षांनंतर पालखी सोहळा (Pandharpur wari 2022) साजरा होत असल्याने वैष्णवांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय. जवळपास चार लाख वारकरी यंदा माऊलीच्या पालखीत सामील झाले आहेत. जेजुरी येथे खंडेरायाच्या भेटीनंतर  पालखीचा मुक्काम काल वाल्हे येथे होता. तर, आज पालखी वाल्हे येथून प्रस्थान करेल. आज रात्रीचा मुक्काम लोणंद या ठिकाणी असणार आहे. तर संत तुकारामांची पालखी (Tukaram maharaj palkhi) काल उंदवडीत मुक्कामी होती.  आज म्हणजेच मंगळवारी 28 जून रोजी पालखी उंदवडी गवळ्याची येथून प्रस्थान करेल. पालखीचा रात्रीचा मुक्काम बारामती (Baramati) येथे असणार आहे. माउली आणि तुकोबा यांच्या पालखीचे पंढरपूर येथे विशेष महत्त्व असते.

मानाच्या पालख्यांपैकी एक म्हणून नरसी नामदेव येथील नामदेव महाराजांच्या पालखीला विशेष महत्त्व आहे. पालखीचा कालचा मुक्काम परळी वैजनाथ येथे होता  तर, आज म्हणजेच 28 जून रोजी पालखी परळी वैजनाथ येथून प्रस्थान करेल आणि  रात्रीचा मुक्काम अंबेजोगाईत असणार आहे.

संत निवृत्तीनाथांची पालखी काल घोगरगांव मुक्कामी होती. तर, आज म्हणजेच 28 जून रोजी पालखी सकाळी घोगरगांव येथून प्रस्थान करेल. त्यानंतर रात्री मिरजगांव येथे पालखीचा रात्रभर मुक्काम असणार आहे. यंदाची वारी ही कोरोना निर्बंधमुक्त असल्याने वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.

हे सुद्धा वाचा

शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी काल वाशिम जिल्ह्यात दाखल झाली. अत्यंत शिस्तबद्ध पालखी म्हणून संत गजानन महाराजांच्या पालखीची ओळख आहे. 6 जूनला शेगाव येथून ही पालखी निघाली. भक्तिमय वातावरणात भक्तांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. पालखीचा कालचा मुक्काम कळंब येथे होता. आज पालखीने  गोविंदपूर येथून प्रस्थान केले असून रात्री पालखीचा मुक्काम तेरणा साखर कारखाना येथे असणार आहे.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें