दररोज घरी कापूर जाळण्याचे 5 फायदे कोणते? चौथा फायदा तर सर्वांसाठीच आवश्यक, पाहा
पूजा करताना किंवा आरती करताना सगळेच जण कापूर लावतात. पण त्याव्यतिरिक्त जर रोज घरात कापूर जाळला तर त्याचे.अनेक फायदे आपल्याला मिळतात. सगळ्यांनाच माहित आहे की कापरामध्ये नकारात्मकता दूर करण्याचे गुणधर्म असतात. घरातील वातावरण शुद्ध करण्यासाठी देखील कापूर जाळणे चांगले मानले जाते. चला जाणून घेऊयात की घरात कापूर जाळण्याचे काय फायदे असतात ते.

camphor at homeImage Credit source: tv9 marathi
पूजेदरम्यान नेहमी एकाग्रतेनं भगवंताची पूजा करावी असं म्हटलं जातं. तसेच अनेकांच्या घरात सकाळची सुरुवातच भवंताच्या नामजपाने, पूजेने, आरतीने होते. प्रत्येकाच्या घरात पूजा करण्याची पद्धत नक्कीच वेगळी असते. पण पूजेदरम्यान वापरण्यात येणाऱ्या वस्तू मात्र शक्यतो सारख्याच असतात. जसं की, फुले, अगरबत्ती, हळद-कुंकू धूप-दीप. त्यापैकी एक म्हणजे कापूर. आरतीदरम्यान कापूर जाळणे शुभ मानले जाते.
घरातच कापूर जाळण्याचे अनेक फायदे
पण फक्त कापूर देवाजवळ लावणे किंवा आरती करताना लावणेच महत्त्वाचे नाही. तर मुख्यत: घरातच कापूर जाळण्याचे अनेक फायदे आहेत. शास्त्रांमध्ये असेही म्हटले गेले आहे की कापूर नकारात्मक ऊर्जा लवकर नष्ट करतो. वैद्यकीय शास्त्र देखील त्याचे अनेक फायदे सांगतात. एकंदरीत, घरात दररोज कापूर जाळल्याने असंख्य फायदे होतात. आज आपण यापैकी काही फायद्यांबद्दल जाणून घेऊया, जे आपल्या घरातील वास्तुनुसार देखील खूप शुभ मानले जातात.
घरात दररोज कापूर जाळण्याचे 5 फायदे
वास्तुदोष दूर होतात
जर तुम्ही तुमच्या घरात दररोज कापूरची ज्योत पेटवायला सुरुवात केली तर हळूहळू वास्तुदोष दूर होतील. हे वास्तुदोष दूर होताच घरात शांती आणि आनंद टिकून राहते. सौभाग्यासाठी देखील महत्त्वाचे असते. म्हणून, दररोज कापूर जाळणे अत्यंत महत्वाचे आहे.
घरात सकारात्मक ऊर्जा येते
प्रार्थना आणि धार्मिक विधींमध्ये दररोज कापूर जाळणे आणि आरती करणे तुमचे मन शांत आणि सकारात्मक ठेवेल. यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा देखील येईल. यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात वाढ होईल आणि इतर सकारात्मक बदल घडून येतील.
आर्थिक समृद्धीमध्ये वाढ
कापूरमध्ये एक शक्तिशाली ऊर्जा असते. त्याच्या सुगंधाने घराच्या प्रत्येक कोपऱ्यात ही ऊर्जा पसरते. ते दररोज जाळल्याने आर्थिक अडचणी कमी होतात आणि संपत्ती वाढते.
वाईट नजरेपासून बचाव करते
वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी कापूर हा सर्वात प्रभावी उपाय आहे. मिश्रणात लवंग घातल्याने त्याची ऊर्जा आणखी वाढते, जी वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक मानली जाते. नकारात्मक ऊर्जा आणि वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी, तसेच घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी दररोज कापूर जाळला तर नक्कीच सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील.
ग्रहांचे वाईट परिणाम संपतात
ग्रहांच्या प्रभावामुळे ग्रस्त असलेले लोक कापूर जाळून त्यांच्या अडचणी लक्षणीयरीत्या कमी करू शकतात. ग्रहांच्या प्रभावामुळे जीवनातील अनेक कामे बिघडू शकतात. अशा परिस्थितीत, इतर उपायांसह घरात दररोज कापूर जाळल्याने परिस्थिती सुधारण्यास मदत होतो.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)
