स्वप्नात साप चावल्याचं दिसल्यास काय अर्थ होतो? काय असतात संकेत?
एखाद्या व्यक्तीला जर सापाने खरोखरच दंश केला तर सापाच्या विषामुळे त्या व्यक्तीच्या मृत्यूची शक्यता असते. मात्र जर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये साप चावताना दिसला तर त्याचा नेमका काय अर्थ होतो? हे आपण जाणून घेणार आहोत.

एखाद्या व्यक्तीला जर सापाने खरोखरच दंश केला तर सापाच्या विषामुळे त्या व्यक्तीच्या मृत्यूची शक्यता असते. मात्र जर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये साप चावताना दिसला तर त्याचा नेमका काय अर्थ होतो. अशा स्वप्नाचे संकेत काय असतात? याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत. साधारणपणे दिवसभर तुमच्या डोक्यात जे विचार सुरू असतात ते स्वप्न तुम्हाला रात्री पडतं. मात्र काही स्वप्न ही विशेष असतात, ती स्वप्न तुम्हाला भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचे संकेत देत असतात, असं स्वप्नशास्त्र सांगतं. अशी देखील मान्यता आहे, ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये कालसर्प योग असतो, त्या व्यक्तीला देखील वारंवार अशी स्वप्न पडतात.
हाताला किंवा पायाला सर्पदंशाचं स्वप्न – जर तुम्हाला स्वप्नात तुमच्या हाताला किंवा पायला सर्पदंश झाला आहे, असं स्वप्न पडलं तर याचा अर्थ आहे की, तुम्हाला विशेष काळजी घेण्याची गरज आहे. तुमच्यासाठी जर एखादं नातं महत्त्वाचं असेल तर त्यात दुरावा निर्माण होण्याचे संकेत अशा स्वप्नामधून मिळतात. तसेच तुम्ही जर भविष्यासाठी एखादी योजना आखत असाल तर त्यामध्ये देखील तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
साप चावल्यानंतरही तुम्ही जिवंत आहात – जर तुम्हाला असं स्वप्न पडलं की तुम्हाला साप चावला आहे, आणि तरी देखील तुम्ही जिवंत आहात तर हे एक चांगले संकेत देणारं स्वप्न आहे. याचा अर्थ असा होतो की तुमची एखादी जुनी शत्रूता असेल तर ती आता संपणार आहे. तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल होणार आहेत.
काळा साप – जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात काळा साप चावत असल्याचं दिसलं तर या स्वप्नाचा अर्थ तुमच्या कुंडलीमध्ये कालसर्प योग असू शकतो असा होतो. तसेच अशा प्रकारचे स्वप्न धन हानीचे संकेत देखील देतात.
पिवळा किंवा पांढर साप – जर तुम्हाला स्वप्नात पिवळा किंवा पांढरा साप चावताना दिसला तर हा एक अत्यंत शुभ संकेत असतो. याचा अर्थ तुम्हाला लवकरच मोठा धन लाभ होणार आहे. करिअरमध्ये तुमची प्रगती होणार असा होतो, तसेच तुमची अध्यात्माकडे ओढ वाढत आहे, याचा देखील हा संकेत असतो.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)