AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ॲप्पलचे स्टीव्ह जॉब्स यांचे गुरू नीम करोली बाबाचं नाव काय? कुठंय कुटुंब? मुलं करतात काय?

Neem Karoli Baba Family : नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारीत हनुमान अंश चित्रपट गेल्या 27 दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. नीम करोली बाबाचं कुटुंब सध्या कुठे आहे? त्यांची मुलं काय करत आहेत हे तुम्हाला माहिती आहे का?

ॲप्पलचे स्टीव्ह जॉब्स यांचे गुरू नीम करोली बाबाचं नाव काय? कुठंय कुटुंब? मुलं करतात काय?
नीम करोली बाबाImage Credit source: एजन्सी
| Updated on: Sep 09, 2026 | 2:42 PM
Share

ॲप्पलचे स्टीव्ह जॉब्स असोत की फेसबुक प्रमुख मार्क झुकरबर्ग, लोकप्रिय हॉलिवूड अभिनेत्री ज्युलिया रॉबर्टस हे जगातील बडे दिग्गज कैंची धाम येथे डोकं टेकवतात. उत्तराखंडमधील या आश्रमाकडे अनेकांचा ओढा आहे. नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारीत हनुमान अंश चित्रपट गेल्या 27 दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर गाजत आहे. हा चित्रपट पाहायला प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली आहे. लोक चित्रपट गृहात पायातील जोडे, चप्पल काढून हा सिनेमा पाहत आहेत. बाबा यांचं कुटुंब सध्या कुठं आहे? त्यांची मुलं काय करत आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का?

काय होते मूळ नाव?

नीम करोली बाबांचं मूळ नाव लक्ष्मी नारायण शर्मा असे होते. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यामधील अकबरपूर या गावात झाला. ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. लहान असतानाच त्यांचे लग्न झाले. पण पुढे त्यांनी गृहस्थाश्रम जीवनाचा त्याग करून साधुत्व पत्करले. ते संन्यासी झाले. असे असले तरी ते कुटुंबाला भेटायला नेहमी येत. गावात रमत.

नीम करोली बाबाचं कुटुंब कुठे आहे?

नीम करोली बाबा यांची पुढची पिढी ही उत्तर प्रदेशातील आग्रा (रामबाग परिसर) आणि भोपाळ या शहरात अत्यंत साधेपणाने राहते. कोट्यवधि भक्तांचे दैवत असलेल्या बाबांचे कुटुंब अगदी साधेपणाने त्यांचे आयुष्य जगत आहे. त्यांनी कधीही बाबांच्या प्रसिद्धीचा गैरफायदा घेतला नाही. कुटुंबातील सदस्य केवळ गरज पडली तेव्हा बाबांच्या ट्रस्ट आणि आश्रमाच्या कार्यात मदत करतात.

मुलं सरकारी उच्च पदावरून सेवानिवृत्त

नीम करोली बाबा यांना दोन मुलं आणि एक मुलगी होती. बाबांची मुलं ही उच्च शिक्षित होती. त्यांनी सरकारी परीक्षा दिली आणि नोकरी मिळवली. मोठा मुलगा सनातन शर्मा हे उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये डीएसपी(DSP) या उच्च पदावर कार्यरत होते. पुढे ते सेवानिवृत्त झाले. दुसरा मुलगा धर्म नारायण शर्मा हे सरकारी जलसंपदा विभागात उच्च पदावर होते. ते सुद्धा सेवानिवृत्त झाले.

कुटुंबियांना हवे घर ताब्यात

नीम करोली बाबा यांचे अकबरपूर गावात घर आहे. हे घर श्री ठाकुर हनुमान जी ट्रस्टचे व्यवस्थापनाकडे आहे. नीम करोली बाबा यांच्या 6 नातींनी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे हे घर ताब्यात देण्याची मागणी केली आहे. याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी तीन सदस्यांची एक समिती गठीत केली आहे. घर ताब्यात न मिळाल्यास कुटुंबियांनी कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे.

Follow Us
2009 मधील वसंत डावखरे प्रकरणाचा निकाल लागणार? उद्धव ठाकरे...
2009 मधील वसंत डावखरे प्रकरणाचा निकाल लागणार? उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंचा व्हिसीद्वारे जबाब
जरांगे नावाचं माकड तोंडाला येईल ते बोलतंय! अजय बारस्करांचा जरांगेंवर घ
Ajay Baraskar | जरांगे नावाचं माकड तोंडाला येईल ते बोलतंय! अजय बारस्करांचा मनोज जरांगेंवर घणाघात
धक्कादायक! काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण... अहिल्यानंगरमध्ये थरकाप...
धक्कादायक! काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण... अहिल्यानंगरमध्ये थरकाप उडवणारा प्रकार
श्रेयस तळपदेंचं DJ बंदीवर मोठं वक्तव्य; सण साजरे करा, पण...
Shreyas Talpade | श्रेयस तळपदेंचं DJ बंदीवर मोठं वक्तव्य; सण साजरे करा, पण...
भाजपची साथ सोडली तर राष्ट्रवादीसोबत विलीनीकरण...रोहित पवार काय म्हणाले
भाजपची साथ सोडली तर राष्ट्रवादीसोबत विलीनीकरण... रोहित पवार असं काय म्हणाले?
नागोठणेचा उड्डाणपूल पुन्हा चर्चेत! सिमेंटच्या प्लेट्सना काचेचा आधार अन
Nagothane Bridge Issue | नागोठणेचा उड्डाणपूल पुन्हा चर्चेत! सिमेंटच्या प्लेट्सना काचेचा आधार अन्...; व्हिडिओ व्हायरल
अकोल्यात 40-45 दिवसांपासून पाऊस नाही; शेतकरी हवालदिल
Akola | अकोल्यात 40-45 दिवसांपासून पाऊस नाही; सोयाबीन पीक उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल
सोलापुरात शोले स्टाईल आंदोलन! मराठा तरुण पाण्याच्या टाकीवर चढले...
Solapur | सोलापुरात शोले स्टाईल आंदोलन! मराठा तरुण पाण्याच्या टाकीवर चढले; नेमक्या मागण्या काय?
धक्कादायक! थलपती विजयचं फेक अकाऊंट चक्क... जळगाव कनेक्शन समोर, नेमकं..
धक्कादायक! थलपती विजयचं फेक अकाऊंट चक्क... जळगाव कनेक्शन समोर, नेमकं काय घडलं?
पावसाने दिली दडी अन् शेतकरी संकटात! विदर्भातील जवळपास 20 तालुक्यांत...
Farmers Issue | पावसाने दिली दडी अन् शेतकरी संकटात! विदर्भातील जवळपास 20 तालुक्यांत 20-22 दिवसांपासून पाऊसच नाही