प्रेमानंद यांच्या भक्तीने आकर्षित होऊन अनवाणी पायांनी स्वामिनारायण नदीकिनारी उभे राहायचे कारण…

बुद्धिमत्ता, कौशल्य आणि यश कितीही मोठे असले, तरी जीवन समतोल ठेवण्यासाठी "भगवंत आणि गुरूंना नेहमी प्रथम स्थान" दिले पाहिजे... अशा महत्त्वाच्या गोष्टी What the Paramhans Poets Teach Us मध्ये सांगितल्या आहेत

प्रेमानंद यांच्या भक्तीने आकर्षित होऊन अनवाणी पायांनी स्वामिनारायण नदीकिनारी उभे राहायचे कारण...
| Updated on: Aug 30, 2026 | 2:46 PM

प्रेमानंद स्वामी आणि निष्कुळानंद स्वामी हे दोघेही स्वामीनारायण संप्रदायातील भगवान स्वामीनारायण यांचे परमपूज्य परमहंस होते, What the Paramhans Poets Teach Us कायक्रमाच्या तिसऱ्या भागात आध्यात्मिक आणि ऐतिहासिक विषयावर चर्चा झाली. प्रेमानंद स्वामी आणि निष्कुळानंद स्वामी: या कवींनी भगवान स्वामिनारायणांच्या भक्तीत अथांग रचना लिहिल्या. निष्कुळानंद स्वामी दररोज कीर्तन लिहिले की मगच अन्न-पाणी ग्रहण करायचे अशा प्रकारची कठोर व्रते पाळत असत

व्हिडीओमध्ये संत सांगत आहेत की, प्रेमानंद स्वामी रात्रीच्या वेळी नदीकिनारी गाणी गात असताना भगवान स्वामिनारायण स्वतः त्यांच्या भक्तीने आकर्षित होऊन अनवाणी पायांनी तिथे येऊन ऐकत उभे राहायचे. त्यांनी असं देखील सांगितलं की, प्रेमानंद स्वामींना त्यांच्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला, परंतु त्यांनी कधीही मान-सन्मान किंवा प्रतिष्ठेची परवा केली नाही. त्यांची निष्ठा ही केवळ त्यांच्या देवावरच होती

एवढंच नाही तर, भगवंताच्या आणि गुरूंच्या लीलांचं स्मरण, पद गाणे किंवा ऐकणे हे दैनंदिन जीवनातील ताणतणाव आणि नकारात्मकता दूर करून मनाला शांती व आध्यात्मिक आरोग्य देते. जे आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचं आहे. फक्त शब्द उच्चारण्यापेक्षा त्या शब्दांमागील भावना आणि प्रेम समजून घेऊन कीर्तन ऐकणे महत्त्वाचे आहे.. असं देखील संत म्हणाले. सध्या हा सर्वत्र चर्चेत आहे.

Follow Us