AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tata च्या कार खरेदीची मोठी संधी, Curvv ते Harrier EV पर्यंत मिळतोय 3.35 लाखांपर्यंत डिस्काउंट

टाटा मोटर्स ऑगस्ट महिन्यात अनेक गाड्यांवर भरीव सवलत देत आहे. कर्व्ह ईव्ही 3.5 लाख रुपयांपेक्षा जास्त सवलत दिली जात असून, हॅरियर ईव्ही, टियागो ईव्ही आणि पंच ईव्हीवरही आकर्षक ऑफर्स मिळत आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या कार्सवर मिळतेय उत्तम डिस्काउंट.

Tata च्या कार खरेदीची मोठी संधी, Curvv ते Harrier EV पर्यंत मिळतोय 3.35 लाखांपर्यंत डिस्काउंट
tata carsImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 30, 2026 | 3:10 PM
Share

Tata Motors : ऑगस्ट महिना Tata Motors ची कार खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. कंपनीकडून आपल्या अनेक ICE, CNG आणि इलेक्ट्रिक कारवर आकर्षक डिस्काउंट आणि विविध ऑफर्स दिल्या जात आहेत. काही इलेक्ट्रिक मॉडेल्सवरील एकूण लाभ 3.5 लाखांपेक्षा जास्त आहेत. या ऑफर्समध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस, स्क्रॅपेज बेनिफिट्स, लॉयल्टी रिवॉर्ड्स आणि फ्रीडम सेलिब्रेशन ऑफर्स यांचा समावेश आहे. तथापि या ऑफर्सची उपलब्धता प्रत्येक ग्राहकासाठी सारखी नाही. डीलरशिप, शहर, मॉडेल वर्ष, व्हेरिएंट आणि स्टॉकनुसार डिस्काउंटमध्ये फरक असू शकतो. चला तर मग Curvv पासून Harrier EV पर्यंत कोणत्या कारवर किती सूट मिळते ते जाणून घेऊयात.

टाटा टियागो आणि टिगोरवर ऑफर्स

नवीन टियागो फेसलिफ्टवर सध्या कोणतीही अधिकृत सूट उपलब्ध नाही . मात्र डीलर्स जुन्या टियागो आणि टिगोर (प्री-फेसलिफ्ट टियागो) च्या निवडक व्हेरिएंटवर सूट देत आहेत. XE व्हेरिएंट या ऑफर्समधून वगळण्यात आला आहे. या गाड्यांवर 15 हजार रूपयांपर्यंतची रोख सूट उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त 10 हजार रूपयांची एक्सचेंज बोनस किंवा 15 हजार रूपयांचा स्क्रॅपेज लाभ दिला जात आहे. काही प्री-फेसलिफ्ट टियागो युनिट्सवर 5 हजार रूपयांचा फ्रीडम सेलिब्रेशन बोनस देखील उपलब्ध आहे. जुन्या टियागो EV स्टॉकवरील ऑफर तर आणखी आकर्षक आहे. या इलेक्ट्रिक हॅचबॅकवरील एकूण लाभ 1.45 लाखांपर्यंत पोहोचू शकतो.

Tata Altroz वरही चांगले फायदे

टाटा अल्ट्रोज कार खरेदीदारऑगस्ट महिन्यात 35 हजार रूपयांपर्यंतच्या रोख लाभासह, 15 हजार रूपयांपर्यंतची एक्सचेंज सपोर्ट आणि 20 हजार रूपयांपर्यंतचा स्क्रॅपेज लाभ घेऊ शकतात.

Tata Punch आणि Punch EV

या महिन्यात टाटा पंचच्या पेट्रोल/सीएनजी मॉडेलवर कोणतीही अधिकृत ऑफर नाही. तथापि कंपनी आणि डीलर्सकडून सध्याच्या पंच ईव्ही स्टॉकवर 1.45 लाख पर्यंतच्या लाभांसह उपलब्ध आहे. ही ऑफर उपलब्ध स्टॉकवर अवलंबून असेल.

Tata Nexon आणि Nexon EV

या महिन्यात नेक्सॉन ICE आकर्षक सवलतींसह सादर केली जात आहे. ग्राहकांना या कार्सवर 55 हजारापर्यंतची रोख सवलत आणि 15 हजाराचे एक्सचेंज सपोर्ट आणि 20 हजार रूपयांपर्यंतचे स्क्रॅपेज फायदे मिळू शकतात. नेक्सॉन ईव्हीवर 45 हजार रूपयांपर्यंतचा बंपर डिस्काउंट आहे.

Tata Curvv आणि Curvv EV

Curvv 30 हजार रुपयांची कॅश डिस्काउंट, 40 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस 45 हजार रुपयांपर्यंतचा स्क्रॅपेज बेनिफिट आणि 50 हजार रुपयांचा लॉयल्टी बोनस देते.

MY2025 स्टॉकमध्ये Curvv EV ला सर्वाधिक नफा मिळत असून एकूण फायदा 3.5 लाखांपेक्षा जास्त झाला आहे.

Tata Sierra, Harrier आणि Safari

नवीन सिएरा ICE निवडक व्हेरिएंट्सवर 30 हजार रूपयांच्या स्क्रॅपेज बेनिफिट आणि लॉयल्टी इन्सेंटिव्हसह उपलब्ध आहे. सिएरा EV वर सध्या कोणतीही अधिकृत सूट नाही. तर हॅरियर आणि सफारीवर 10 हजार रूपयांचा कॅश डिस्काउंट, 25 हजार रूपयांच्या एक्सचेंज बोनस आणि 35 हजाराचा स्क्रॅपेज बेनिफिटसह उपलब्ध आहेत.

1 लाख रुपयांपर्यंतच्या ऑफर्स

हॅरियर ईव्हीवर अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत, ज्यामध्ये 1 लाख रूपयांपर्यंतची ‘फ्रीडम सेलिब्रेशन’ ऑफर, 50 हजार रूपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 75 हजार रूपयांपर्यंतचा स्क्रॅपेज बेनिफिट यांचा समावेश आहे.

विद्यमान टाटा ईव्ही ग्राहक 1 लाख पर्यंतच्या लॉयल्टी बेनिफिट्सचा लाभ घेऊ शकतात. त्यात टाटा आयसीई कारच्या खरेदीदारांना अतिरिक्त लॉयल्टी बेनिफिट्सचा लाभ घेता येईल. याव्यतिरिक्त टाटा ग्रुपच्या कर्मचाऱ्यांसाठी निवडक व्हेरिएंट्सवर कॉर्पोरेट डिस्काउंट्स उपलब्ध आहेत.

कृपया नोंद घ्यावी की या ऑफर्स अंदाजित आहेत. शहर, डीलरशिप, स्टॉक, मॉडेल वर्ष, व्हेरिएंट आणि ग्राहकाच्या पात्रतेनुसार अंतिम सवलती बदलू शकतात. आपली कार खरेदी करण्यापूर्वी कृपया आपल्या जवळच्या टाटा मोटर्स डीलरकडून ऑफरची संपूर्ण माहिती विचारून घ्यावी.

Follow Us
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
खडसेंच्या 75 व्या वाढदिवसाचा अमृत सोहळा; शरद पवारांची विशेष उपस्थिती
खडसेंच्या 75 व्या वाढदिवसाचा अमृत सोहळा; शरद पवारांची विशेष उपस्थिती
कार्यक्रमाबाबत ठाम राहणं संजय जाधवांची मोठी चूक, आता... जरांगे संतप्त
कार्यक्रमाबाबत ठाम राहणं संजय जाधवांची खूप मोठी चूक, आता... मनोज जरांगे मुंबईत बदला घेणार?
मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, राजकीय...
मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, राजकीय वातावरण तापलं?
अंतरावली सराटीत आंदोलकांची गर्दी वाढली, पोलिस बंदोबस्त तरी...
अंतरावली सराटीत आंदोलकांची गर्दी वाढली, पोलिस बंदोबस्त तरी... पहा व्हिडीओ
तर मोठा राडा होणार, शिंदेंचा कार्यक्रम... जरांगेंचा थेट संजय जाधवांना
तर मोठा राडा होणार, शिंदेंचा कार्यक्रम... मनोज जरांगेंचा थेट खासदार संजय जाधवांना फोन
राष्ट्रवादी एकच, फक्त... सुप्रिया सुळेंचं माध्यामांसमोरच मोठं विधान
Supriya Sule : राष्ट्रवादी एकच, फक्त... सुप्रिया सुळेंचं माध्यामांसमोरच मोठं विधान
राष्ट्रवादी एकत्र याव्यात, म्हणून... बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ;
राष्ट्रवादी एकत्र याव्यात, म्हणून... बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ; पक्षात नेमकं काय घडतंय?
ज्याला वाटतं, भारतात एकही मुस्लीमा नसावा,तो...मोहन भावगवत काय म्हणाले?
Mohan Bhagwat | ज्या हिंदूला वाटतं, भारतात एकही मुस्लीमा नसावा, कदाचित तो हिंदू नसेल - भागवत
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस; अंतरवाली सराटीत मराठा बांधव...
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस; अंतरवाली सराटीत मराठा बांधवांचा प्रचंड जनसागर