कधी आहे मासिक शिवरात्र? जाणून घ्या तिथी, मुहूर्त आणि पूजा विधी

मासिक शिवरात्रीचे व्रत हे महादेवांसाठी केले जाते. दर महिन्याला महादेवांचे भक्त या दिवशी पूर्ण भक्तिभावाने उपवास करून पूजा करतात. अनेकदा लोकांमध्ये उपवास आणि सणांच्या तारखांबद्दल संभ्रम असतो. त्यामुळे यावर्षीची पहिली मासिक शिवरात्र कधी आहे ते जाणून घेऊ.

कधी आहे मासिक शिवरात्र? जाणून घ्या तिथी, मुहूर्त आणि पूजा विधी
Masik Shivratri
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jan 30, 2025 | 2:57 PM

हिंदू धर्मात मासिक शिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी महादेवाची पूजा करतात आणि उपवास करतात. मासिक शिवरात्रीला रात्रीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. भगवान महादेवाला हे व्रत समर्पित असून हे दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला केले जाते. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मासिक शिवरात्र सर्वोत्तम मानली जाते. असे मानले जाते की या दिवशी महादेवांची पूजा केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना, इच्छा पूर्ण होतात आणि घरात सुख-समृद्धी येते. त्यासोबतच जीवनातील सर्व त्रासांपासूनही मुक्ती मिळते.

कधी आहे मासिक शिवरात्र?

पंचांगानुसार माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी सोमवारी 27 जानेवारी रोजी 8:34 मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी संध्याकाळी 7: 35 मिनिटांनी संपेल. शिवरात्री ची पूजा रात्री केली जाते. त्यामुळे 27 जानेवारीला शिवरात्रीची पूजा केली जाणार आहे.

मासिक शिवरात्रीच्या पूजेचा मुहूर्त कधी आहे?

माघ महिन्यातील मासिक शिवरात्रीला पूजेचा शुभ मुहूर्त 12: 07 मिनिटांनी सुरू होणार असून पहाटे 1: 00 पर्यंत असणार आहे. त्यामुळे या दिवशी महादेवांची पूजा करण्यासाठी भाविकांना एकूण 53 मिनिटांचा वेळ मिळणार आहे.

मासिक शिवरात्र पूजा विधी

मासिक शिवरात्रीच्या दिवशी सकाळी उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करा. त्यानंतर सूर्याला अर्घ्य द्या. सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर तुमच्या घरातील देवघर स्वच्छ करा आणि संपूर्ण घरात गंगाजल शिंपडा. एका चौरंगावर शिवलिंग स्थापित करा किंवा महादेवाचा फोटो ठेवा. महादेवाला पाणी, कच्चे दूध, गंगेचे पाणी, बेलपत्र, धोत्र्याचे फुल, अगरबत्ती, फळे, फुले आणि मिठाईचा नैवेद्य दाखवा. त्यानंतर शिवचालीसा आणि मंत्राचा जप करा. शेवटी महादेवाची आरती करून प्रसाद घ्या.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)