AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरातील मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असणे सर्वात शुभ मानले जाते? पूर्व, पश्चिम, उत्तर की दक्षिण

वास्तुशास्त्रानुसार घरातील मुख्य दरवाजाची योग्य दिशा अत्यंत महत्त्वाची आहे. मुख्य दरवाजातून सकारात्मक ऊर्जा आणि देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते. त्यामुळे घर खरेदी करताना किंवा घर बांधताना घराच्या मुख्य दाराची दिशा नक्कीच पाहिली पाहिजे. चला जाणून घेऊयात की घरातील मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असणे सर्वात शुभ मानले जाते.

घरातील मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असणे सर्वात शुभ मानले जाते? पूर्व, पश्चिम, उत्तर की दक्षिण
Which direction is considered most auspicious to have the main door of the house facingImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 01, 2025 | 8:18 PM
Share

हिंदू धर्मात वास्तुशास्त्राचे विशेष महत्त्व असते. म्हणून घरात काहीही करण्यापूर्वी किंवा काही बदल करण्यापूर्वी वास्तुशास्त्राचा विचार नक्की केला जातो. विशेषत: घरातील एखादी वस्तू कोणत्या दिशेला ठेवावी किंवा दार कोणत्या दिशेला असावं हे नक्कीच ठरवलं जातं. त्याचप्रमाणे, घर खरेदी करताना, लोक दरवाजा कोणत्या दिशेला आहे याचा विचार करतात. कारण, कधीकधी खराब वास्तुमुळे घर फलदायी ठरत नाही. याचा जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

कारण घराचा मुख्य दरवाजा देवी लक्ष्मीचे स्वागत करतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा आणतो. म्हणून, मुख्य दरवाजा योग्य दिशेने ठेवणे शुभ आहे. आता प्रश्न असा आहे की, दरवाजा कोणत्या दिशेला ठेवावा? दारांशी संबंधित काही महत्त्वाचे नियम आहेत का? हे जाणून घेऊयात.

घराच्या दारासाठी सर्वात शुभ दिशा कोणती?

घराचा मुख्य दरवाजा ईशान्य किंवा पूर्व-पश्चिम दिशेला असणे शुभ मानले जाते. प्रवेशद्वार पश्चिम दिशेच्या मध्यभागी असावे. असे मानले जाते की अशा घरात आनंद आणि समृद्धी येते. शिवाय, मुख्य दरवाजा खूप लहान किंवा खूप मोठा नसावा. म्हणून, घर बांधताना, मुख्य दरवाजाचा आकार इमारतीच्या आकाराच्या प्रमाणात असावा याची खात्री करावी.

स्वयंपाकघराचा दरवाजा कोणत्या दिशेला शुभ असतो?

घराची समृद्धी स्वयंपाकघराशी देखील जोडलेली असते. म्हणून, स्वयंपाकघराचा दरवाजा उत्तर, पश्चिम किंवा आग्नेय दिशेला असावा. जास्तीत जास्त सकारात्मक उर्जेसाठी उत्तर आणि पश्चिम दिशा सर्वोत्तम मानल्या जातात. जर या दिशा शक्य नसतील तर आग्नेय दिशा हा एक चांगला पर्याय आहे, कारण ती अग्नि तत्वाची दिशा आहे, ज्यामुळे ते स्वयंपाकघरासाठी आदर्श बनते.

घराच्या दारावर काय बांधणे शुभ आहे?

वास्तुनुसार, घराच्या दारावर वाळलेल्या तुळशीचे मूळ, मिठाची पोटली, मंगल कलश किंवा आंब्याच्या पानांचे तोरण लटकवू शकता. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर राहते, आर्थिक समृद्धी आणण्यासाठी आणि घरात शांती आणि आनंद राखण्यासाठी हे उपाय शुभ मानले जातात.

मुख्य दरवाजासमोर वस्तू ठेवू नयेत

मुख्य दरवाजासमोर कोणताही पसारास किंवा कचरा नसावा. मुख्य दरवाजाजवळ कचरा, दगड,धूळ किंवा अस्ताव्यस्तपणा नसावा. किंवा साचलेले पाणीही नसावे. यामुळे घरात गरिबी येऊ शकते. म्हणून, घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवावा. देवी लक्ष्मीही यामुळे प्रसन्न होते.

दरवाजा सजवला पाहिजे

घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी, मुख्य दरवाजा सजवावा. तुम्ही मुख्य दरवाजावर ओम किंवा स्वस्तिक देखील काढू शकता आणि धातू किंवा लाकडी नेमप्लेट लावू शकता. मोठ्या घंटाऐवजी, मुख्य दरवाजावर मंद आवाज असलेली डोअरबेल लावली तरी चालेल.

महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.