AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कॉकरोच’नंतर आता E20 जनता पार्टीची हवा, काही मिनिटात हजारो फॉलोअर्स, नव्या मागणीने सरकारचं टेन्शन वाढलं!

ज्या पद्धतीने CJP ने नीट पेपरफुटी प्रकरणावर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, त्याचप्रमाणे E20 जनता पार्टीने इथेनॉल मिश्रीत पेट्रोलला विरोध केला आहे

'कॉकरोच'नंतर आता E20 जनता पार्टीची हवा, काही मिनिटात हजारो फॉलोअर्स, नव्या मागणीने सरकारचं टेन्शन वाढलं!
e20 janta party Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 26, 2026 | 8:40 PM
Share

E20 janta party : दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर कॉकरोच जनता पार्टीचे महिनाभरापेक्षा अधिक काळ आंदोलन सुरू होते. या आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. सध्या शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. CJP च्या आंदोलनात देशभरातील हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आता हे आंदोलन संपुष्टात आले असले, तरी त्याच धर्तीवर सोशल मीडियावर आणखी एका नव्या मोहिमेचा उदय झाला आहे. या मोहिमेला आता E20 जनता पार्टी असे नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या नव्या मोहिमेला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद लाभतो आहे.

खाते सुरु करताच त्यावर हजारो फॉलोअर्स

पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रित E20 इंधनाचा वापर करण्याच्या धोरणाला देशभरात विरोध केला जातोय. हा विरोध दर्शवण्यासाठी यापूर्वी काही संघटनांनी निदर्शनेही केली. आता हा सोशल मीडियावरही दिसू लागला आहे. ई-20 इंधनाला विरोध करण्यासाठी सोशल मीडियावर E20 जनता पार्टी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी एक्स (X) आणि इन्स्टाग्रामवर खाते उघडण्यात आले आहेत. विशेष म्हणजे खाते सुरु करताच त्यावर हजारो फॉलोअर्स झाले आहेत. E20 जनता पार्टी या एक्स खात्यावर 22 हजारांहून अधिक, तर इन्स्टाग्रामवर 30 हजारांपेक्षा जास्त लोकांनी फॉलो केले आहे.

E20 जनता पार्टीची नेमकी मागणी काय?

ज्या पद्धतीने CJP ने नीट पेपरफुटी प्रकरणावर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, त्याचप्रमाणे E20 जनता पार्टीने इथेनॉल मिश्रीत पेट्रोलला विरोध केला आहे. “आमच्या गाड्यांवर प्रयोग करणे थांबवा. भारतील नागरिकांना गाड्यात कोणते इंधन टाकावे याची निवड करण्याचा अधिका पाहिजे. आमची वाहने ही वेगवेगळ्या चाचण्या करण्यासाठी नाहीतत. आमची आमची वाहने ही कष्ट करून कर भरून घेतलेली आहेत,” असं म्हणत E20 जनता पार्टीने E20 इंधनाला कटोर विरोध केला आहे.

पसंतीचे इंधन निवडण्याचे स्वातंत्र्य मिळावे

वाहननिर्मित करणाऱ्या कंपन्यांनी ज्या इंधनाची शिफारस केलेली आहे, तेच इंधन ग्राहकांना उपलब्ध करून द्यावे. सामान्य नागरिकांवर कोणतेही इंधन किंवा तंत्रज्ञान सक्तीने लादू नये. तसेच ग्राहकांना आपल्या पसंतीचे इंधन निवडण्याचे स्वातंत्र्य मिळावे, या E20 जनता पार्टीच्या प्रमुख मागण्या आहेत. दरम्यान, आता या मोहिमेचे पुढे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...