रविवारनंतर सोमवारच का येतो? बुधवार का नाही? तुम्हालाही नाही सांगता येणार योग्य कारण
आपण लहाणपणापासून ऐकत आलो आहोत, रविवारनंतर सोमवार येतो, सोमवारनंतर मंगळवार, नंतर बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि पुन्हा रविवार वर्षानुवर्ष हे चक्र असंच चालू राहातं.

आपण लहाणपणापासून ऐकत आलो आहोत, रविवारनंतर सोमवार येतो, सोमवारनंतर मंगळवार, नंतर बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि पुन्हा रविवार वर्षानुवर्ष हे चक्र असंच चालू राहातं. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का की? आठवड्याची सुरुवात ही रविवारनेच का होते? आणि त्यानंतर सोमवारच का येतो? रविवारनंतर मंगळवार किंवा बुधवार का येत नाही? याच कारण काय आहे? तर यामागे देखील एक शास्त्र आहे, त्याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत.
खरं पाहिलं तर हा काही योगायोग नाहीये, त्यामागे एक प्राचीन आणि आश्चर्यकारक अशी एक विशिष्ट गणना आहे. तुम्ही भारतामध्ये राहत असाल, जपानमध्ये किंवा अमेरिकेमध्ये जगाच्या पाठीवर कुठेही जा, रविवारनंतर सोमवारच येणार आहे, आठवड्यांच्या वारांच्या क्रमामध्ये कोणताही बदल होत नाही, चला तर मग जाणून घेऊयात त्यामागचं नेमंक लॉजिक काय आहे?
या कालमापन पद्धतीची सुरुवात होते ती वैदिक ज्योतिषापासून वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये या कालमापन पद्धतीसाठी होरा असा एक खास शब्द वापरला आहे. होराचा अर्थ तास असा होतो. एक होरा म्हणजे एक तास. ज्योतिषाशास्त्रामध्ये प्रत्येक तासाचा संबंध हा कोणत्या न कोणत्या ग्रहाशी असतो. याचाच अर्थ प्रत्येक तासावर कोणत्या न कोणत्या ग्रहाचा प्रभाव असतो. यावरून वाराची नाव निश्चित करण्यात आली आहेत.
दिवसाची पहिली होरा सूर्याची मानण्यात आली आहे, त्यामुळे पहिला वार असतो तो रविवार त्यानंतर दुसरी होरा ही सोम अर्थात चंद्राची म्हणून सोमवार तिसरी मंगळाची, चौधी बुधाची असा तो क्रम आहे. मग काही जण असाही प्रश्न उपस्थित करतात की सर्वात मोठा ग्रह हा गुरु आहे, मग रविवारनंतर गुरुवार किंवा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह हा बुध आहे म्हणून रविवारनंतर बुधवार का येत नाही? तर याचं उत्तर देखील या होरामध्येच लपलेलं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पहिला होरा सूर्याचा आणि नंतर चंद्राचा असा त्याचा क्रम आहे. आणि याच क्रमानुसार वाराची नावं निश्चित झाली आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
