Hanuman Ji | हनुमानजींना बजरंगबली हे नाव कसं पडलं, जाणून घ्या याबाबतची पौराणिक कथा

| Updated on: Aug 17, 2021 | 2:32 PM

मंगळवारचा दिवस हा हनुमानजींना समर्पित असतो. या दिवशी हनुमानजींची पूजा केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. अनेक लोक हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी उपवास ठेवतात. याशिवाय ज्योतिषशास्त्रात विशेष उपाय सांगितले गेले आहेत. हे उपाय केल्याने कुंडलीतील मंगळ दोषाचा प्रभाव कमी होतो.

Hanuman Ji | हनुमानजींना बजरंगबली हे नाव कसं पडलं, जाणून घ्या याबाबतची पौराणिक कथा
Hanuman
Follow us on

मुंबई : मंगळवारचा दिवस हा हनुमानजींना समर्पित असतो. या दिवशी हनुमानजींची पूजा केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. अनेक लोक हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी उपवास ठेवतात. याशिवाय ज्योतिषशास्त्रात विशेष उपाय सांगितले गेले आहेत. हे उपाय केल्याने कुंडलीतील मंगळ दोषाचा प्रभाव कमी होतो. हनुमानजींना संकटमोचन म्हणूनही ओळखले जाते. कारण, ते नेहमी त्याच्या भक्तांचे दुःख दूर करतात. शक्ती आणि बुद्धीची देवता हनुमानजी यांना बजरंगबली असेही म्हणतात. पण त्यामागील दंतकथेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

हनुमानजींना बजरंगबली का म्हणतात?

हनुमानजींना बजरंगबली म्हणतात. यामागे दोन आख्यायिका आहेत. पहिल्या श्रद्धेनुसार बजरंगबली खूप शक्तिशाली आहेत. त्यांचे शरीर व्रजासारखे आहे, म्हणून त्यांना बजरंगबली म्हणतात. दुसऱ्या आख्यायिकेनुसार, हनुमानजींनी श्रीरामाला प्रसन्न करण्यासाठी शरीराला सिंदूर लावला होता, त्यामुळे त्यांचे नाव बजरंगबली असे पडले. या श्रद्धेशी संबंधित आख्यायिकेबद्दल जाणून घ्या –

एकदा देवी सीता सिंदूर लावत होती. मग हनुमानजींनी विचारले की देवी, तुम्ही तुमच्या भांगे सिंदूर का लावता? यावर प्रतिक्रिया देताना देवी सीता म्हणाली की ती पती श्री राम यांच्या दीर्घायुष्य आणि चांगल्या आरोग्यासाठी सिंदूर लावते. धर्मग्रंथातही सिंदूरचे महत्त्व सांगितले गेले आहे. हिंदू धर्मानुसार, विवाहित स्त्री जी भांगेत सिंदूर लावते, तिच्या पतीचे आयुष्य दीर्घ असते आणि त्याचे आरोग्यही चांगले असते.

बजरंगबलीने विचार केला की जर सिंदूर लावण्याने इतका फायदा होत असेल तर ते संपूर्ण शरीराला सिंदूर लावतील. यामुळे भगवान राम अमर होतील. असा विचार करून हनुमानजी यांनी आपल्या संपूर्ण शरीराला सिंदूर लावला. जेव्हा भगवान श्रीरामाने हनुमानजींना पाहिले तेव्हा ते त्यांच्या भक्तीनें खूप प्रसन्न झाले. भगवान श्रीराम म्हणाले की आजपासून तुला बजरंगबली म्हणून ओळखले जाईल. बजरंगबलीमध्ये बजरंग म्हणजे केसशी आणि बली म्हणजे शक्तिशाली असा त्याचा अर्थ होतो.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Tuesday Astro Tips | कुंडलीतील मंगळ दोष दूर करण्यासाठी मंगळवारी हे उपाय करा

Raksha Bandhan 2021 : रक्षाबंधनच्या दिवशी या देवांना बांधा राखी, पूर्ण होतील सर्व इच्छा