
अनेकदा रात्री कुत्री रडताना, मोठ्या मोठ्याने भुंकताना ऐकतो. त्याबद्दल अनेकांचे असे म्हणणे असते की ते दुर्दैवाचे लक्षण मानले जाते. आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांनाही हे बोलताना आपण ऐकलं असेल की कुत्री रडणे हे फार अशुभ मानले जाते. पण यामागील नक्की कारण काय आहे हे जाणून घेऊयात. प्राचीन मान्यतेनुसार, कुत्र्याचे रडणे ही वाईट बातमी किंवा दुर्दैवाचे संकेत मानले जाते. वडीलधारी लोक म्हणतात काही दुर्घटना घडणार असेल किंवा काही अशुभ घडणार असेल तर त्याचे संकेत कुत्र्यांना आधीच मिळतात. धार्मिक तज्ञांच्या मते, रात्री उशिरा कुत्र्याचे रडणे म्हणजे त्यांना झालेल्या संकटाची चाहूल असते.
कुत्र्याचे रडणे म्हणजे नेमके कसले संकेत
शकुन शास्त्रांनुसार, जर कुत्रा घराबाहेर रडत असेल तर तो कुटुंबावर संकट, त्रास किंवा कलह येण्याचे संकेत दर्शवत असतो. जर तो दारात जोरजोरात भुंकत असेल तर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. अशावेळी कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी, ताबडतोब हनुमान चालीसा पठण करा आणि तुमच्या घराच्या कोप्यात एका वाटीत मीठ ठेवा तसेच आणि दाराल लिंबू लावा.
नकारात्मक उर्जेची भावना
रात्री कुत्र्यांच्या ओरडण्यामागील आणखी एक समजुत अशी आहे की त्याला जवळ आत्मा किंवा नकारात्मक ऊर्जा जाणवते. कुत्र्यांचे सहावे इंद्रिय तीव्र असते. अशा परिस्थितीत त्यामुळे त्याला अशा ऊर्जाही प्रखरतेनं जाणवतात. अशावेळी घराभोवती गंगाजल शिंपडा, “ॐ नमः शिवाय” चा जप करा आणि शनि मंत्राचा जप करा.
शारीरिक अस्वस्थता
कधीकधी कुत्रे भूक, दुखापत, आजार किंवा वेदनांमुळे रडतात आणि भुंकतात जेणेकरून ते त्यांच्या घरच्यांना, मालकाला हे सांगण्याचा प्रयत्न करत असतात. जर तुमचा पाळीव कुत्रा उदास असेल, खाण्यास नकार देत असेल किंवा त्याच्या डोळ्यातून पाणी येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. याला काही अनुचित कारण म्हणून जबाबदार धरणे चुकीचे ठरेल.
एकाकीपणाची कारणे
कुत्रे हे सामाजिक प्राणी आहेत आणि त्यांना एकटे राहणे आवडत नाही. ते रात्री रडून आणि भुंकून त्यांच्या मित्रांना म्हणजे इतर कुत्र्यांना हाक मारतात. वैज्ञानिकदृष्ट्या, हे त्यांचे संवादाचे स्वरूप असते. कधीकधी, जेव्हा कुत्रे एकमेकांशी बोलतात तेव्हा ते रडल्यासारखेच वाटते.
रडण्याचा संदेश कसा द्यावा
विज्ञान म्हणते की रडून किंवा भुंकून, कुत्रा त्याच्या साथीदारांना धोका, भूक किंवा एकाकीपणाबद्दल संदेश देतो. कुत्र्याचे रडणे नेहमीच वाईट असते असे नाही. जर कुत्रा रडत असेल तर तो धोक्यात आहे का ते पाहण्यासाठी आजूबाजूला पाहा.
घाबरू नका, कृती करा
जर कुत्रा रडत असेल लगेच घाबरून जाता हनुमान चालीसाचा पाठ करा, काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घाला आणि घराभोवती गंगाजल शिंपडा. जर असे वारंवार होत असेल तर पुजाऱ्याचा सल्ला घ्या. बहुतेक प्रकरणांमध्ये, हे सामान्य आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)