गणेशपूजेसाठी बुधवार का शुभ मानला जातो, काय आहे परंपरेमागील रहस्य?

Ganpati puja benefits: गणराया सर्वांचा लाडका आहे. गणेशोत्सवाच्या काळात गणरायाच्या स्वागतासाठी मोठ्या उत्साहाने तयारी सुरु असते... पण गणपतीची पूजा करण्यासाठी देखील एक दिवस ठरलेला असतो आणि तो म्हणजे बुधवार...

गणेशपूजेसाठी बुधवार का शुभ मानला जातो, काय आहे परंपरेमागील रहस्य?
| Updated on: Oct 29, 2025 | 3:39 PM

Ganpati puja benefits: हिंदू धर्मात, आठवड्यातील सातही दिवस देवतेच्या पूजेसाठी समर्पित असतात. बुधवार हा दिवस गणरायाला समर्पित मानल जातो. या दिवशी गणतीची पूजा केल्याने बुद्धी, विवेक आणि संपत्ती मिळते. सांगायचं झालं तर, मान्यतेनुसार, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणरायाची पूजा केल्यानंतर केली जाते. एवढंच नाही तर, पूजेची सुरुवात देखील गणरायापासून होते. गणपती म्हणजे अडथळे दूर करणारा, बुद्धीचा देवता आणि सौभाग्य आणणारा मानला जातो. आठवड्यातील सात दिवसांपैकी बुधवार हा विशेषतः भगवान गणेशाला समर्पित असतो.

ही परंपरा ज्योतिष आणि पौराणिक रहस्यांमध्ये खोलवर रुजलेली आहे. बुधवार हा दिवस गणेशाची पूजा करण्यासाठी किती शुभ असतो हे फार कोणाला माहिती देखील नसेल… तर आता जाणून घेऊ की बुधवार गणरायाला का समर्पित आहे…

बुधवार या दिवसाचा थेट संबंध बुध ग्रहाशी आहे. ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहांना ग्रहांचा राजा मानलं जातं. हा ग्रह बुद्धिमत्ता, वाणी, तर्क, व्यवसाय, शिक्षण आणि कौशल्याचा कारक मानला जातो. गणपती हे स्वतः बुद्धी आणि ज्ञानाचे देवता आहेत. बुध ग्रह देखील बुद्धीचे प्रतिनिधित्व करत असल्याने, या दोघांमध्ये एक मजबूत संबंध आहे.

ज्योतिषींनी सांगितल्यानुसार, ज्यांच्या कुंडलीत बुध ग्रह कमकुवत आहे किंवा त्याच्याशी संबंधित दोष आहेत त्यांनी बुधवारी भगवान गणेशाची पूजा करावी. गणपतीची पूजा केल्याने बुध ग्रहाचे दोष शांत होतात आणि व्यक्तीला बुद्धिमत्ता, वक्तृत्व आणि व्यवसायात विशेष लाभ मिळतो. बुधवारला सौम्यावर असेही म्हणतात, ज्याचा अर्थ शांत आणि शुभ दिवस आहे. या दिवशी गणेशाची पूजा करणे त्यांच्या सौम्य स्वभावामुळे आणि शांत स्वभावामुळे शुभ मानले जाते.

पौराणिक कथांमध्ये लपलं आहे रहस्य

मान्यतेनुसार, जेव्हा माता पार्वती यांच्या आशीर्वादाने गणरायाचा जन्म झाला. तेव्हा कैलास पर्वतावर बुध देव देखील उपस्थित होते. त्यांची उपस्थिती अत्यंत शुभ मानली जाते. बुध ग्रहाच्या या शुभ उपस्थितीमुळे, बुधवार हा गणेशाची पूजा करण्याचा दिवस असल्याचं घोषित करण्यात आलं.
बुधवारी गणरायाची पूजा केल्याने कोणते लाभ होतात…

बुध ग्रहाच्या दोषांपासून मुक्ती: ज्या लोकांच्या कुंडलीत बुध ग्रह कमकुवत आहे त्यांनी बुधवारी भगवान गणेशाची पूजा करावी.

बुद्धिमत्ता आणि भाषणात सुधारणा: हा दिवस विद्यार्थी, लेखक, वक्ते आणि व्यावसायिकांसाठी खूप शुभ आहे. गणेशाला विघ्नहरण करणारा म्हणून ओळखलं जातं, म्हणून बुधवारी त्यांची पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात.

आर्थिक प्रगती: भगवान गणेशाला नफ्याची देवता म्हणूनही ओळखलं जातं, म्हणूनच हा दिवस संपत्ती संपादन आणि प्रगतीचं प्रतीक मानला जातो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)