AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मौनी अमावस्येच्या दिवशी का केली जाते मौन साधना? जाणून घ्या काय आहे मौन साधना करण्याचे नियम

हिंदू धर्मात मौनी अमावस्येला खूप महत्त्व आहे हिंदू धर्म ग्रंथांमध्ये या दिवशी स्नान आणि दान करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. मौनी अमावस्येला मौन व्रत केले जाते. या दिवशी मौन पाळण्याचे महत्त्व जाणून घेऊ तसेच त्याचे नियम काय आहे ते पाहू.

मौनी अमावस्येच्या दिवशी का केली जाते मौन साधना? जाणून घ्या काय आहे मौन साधना करण्याचे नियम
आकांक्षा वाघ
आकांक्षा वाघ | Edited By: | Updated on: Jan 26, 2025 | 4:15 PM
Share

हिंदू धर्मामध्ये अमावस्या ही तिथी अत्यंत महत्त्वाची मानले जाते. वर्षातून 12 अमावस्या असतात माघ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या म्हणतात. मौनी अमावस्या आध्यात्मिक दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाची मानली जाते. मौनी अमावस्येला स्नान आणि दान केले जाते. असे मानले जाते की या दिवशी स्नान आणि दान केल्याने पुण्य प्राप्त होते.

मौनी अमावस्या ही पूर्वजांसाठीही महत्त्वाची मानली जाते. या दिवशी पितरांना नैवेद्य आणि पिंडदानही केले जाते. या दिवशी पितरांना तर्पण आणि पिंडदान अर्पण केल्याने तीन पिढ्यातील पितरांना मोक्ष प्राप्त होतो. या दिवशी मौन साधनाही केली जाते. मौनी अमावस्येला मौन ध्यान केल्याने शुभ फळ मिळते. त्यामुळे या दिवशी मौनसाधना करण्याला काय महत्त्व आहे ते जाणून घेऊ तसेच त्याचे नियम काय आहे ते पाहू.

कधी आहे मौनी अमावस्या?

यावर्षी माघ महिन्यातील अमावस्या तिथी 28 जानेवारीला संध्याकाळी 7: 35 वाजता सुरू होईल आणि 29 जानेवारीला संध्याकाळी 06: 05 मिनिटांनी संपेल. त्यामुळे 29 जानेवारीला मौनी अमावस्या असणार आहे. या दिवशी उपवास आणि पूजाही केली जाते. तसेच या दिवशी महा कुंभामध्ये दुसरे शाही स्नान होणार आहे.

मौनी अमावस्येला मौन साधनेचे महत्त्व

मौनी अमावस्येला ऋषीमुनी मौन पाळतात. मौनी अमावस्येला मौन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मौनी अमावस्येला केवळ बोलण्यातच नाही तर मनातही शांतता असते म्हणून हे व्रत केले जाते. मौन साधना केल्याने तणावातून आराम मिळतो, मानसिक शांती मिळते, एकाग्रता वाढते आणि ध्यान करणे सोपे होते. शांतता देवाशी जोडण्यास मदत करते. मौनी अमावस्येला मौन पाळल्याने मोक्ष प्राप्त होतो.

मौन साधनेचे नियम

  • मौनी अमावस्येच्या दिवशी गंगा स्नान करून ध्यान करावे.
  • यानंतर मौन पाळावे दिवसभर मौन धारण करून जप आणि तपश्चर्या करावी.
  • हा दिवस पूर्ण संपल्यानंतर मग मौन सोडावे आणि त्यानंतरच बोलायला सुरुवात करावी.
  • मौन व्रत केल्यानंतर रामाचे नाम घेणे सर्वोत्तम मानले जाते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान