
आजही जवळपास सगळेच जण मंदिरात गेल्यानंतर दर्शन झाल्यानंतर लगेच घरी न निघता मंदिरात किंवा मंदिराच्या पायऱ्यांवर थोड्यावेळ बसतात. देवाचं नामस्मरण करतात. तसेच अनेकदा आपल्याला घरातील मोठ्यांनी हे सांगितलं असेल की दर्शन झाल्यानंतर लगेच घरी न निघता काही सेकंद तरी पायऱ्यांवर बसावं. त्यावेळी देवाचं नामस्मरण करावं. पण यामागे इतरही कारणं आहेत जाणून घेऊयात.
दर्शनानंतर मंदिराच्या पायऱ्यांवर का बसावे?
आपल्यापैकी अनेकांना या प्रथेमागील परंपरेची माहित नाही. मंदिराच्या पायऱ्यांवर बसणे हे केवळ आराम करण्याचे ठिकाण नाही. किंवा ती फक्त प्रथा नाही तर त्यामागे एक कारण आहे, ती एक परंपरा आहे. देवाच्या दर्शनानंतर मंदिराच्या पायऱ्यांवर का बसावे हे जाणून घेऊयात.
मंदिराच्या पायऱ्यांवर बसल्यावर काही गोष्टी बोलणे टाळावे
मंदिरात देवाचे दर्शन झाले की लोक मंदिरात किंवा पायऱ्यांवर बसतात पण त्यावेळी खरंतर देवाचं नामस्मरण करणे गरजेचे असते. पण यावेळी मंदिराच्या पायऱ्यांवर बसून घरगुती गोष्टी, राजकारण आणि धर्म किंवा कोणतेही वादावादीच्या विषयांवर चर्चा कधीही करू नये. दर्शनानंतर मंदिराच्या पायऱ्यांवर बसणे ही एक प्राचीन परंपरा आहे. शास्त्रात असे म्हटले आहे की जेव्हा जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा आपण दर्शनानंतर काही सेकंद का होईना पायऱ्यांवर बसून भगवंताचे ध्यान करणे गरजचे आहे.
पायऱ्यांवर बसून मंत्राचा जप करा
मंदिराच्या पायऱ्यांवर बसताच, तुम्ही एखादा श्लोक वाचला पाहिजे, किंवा एकादा नाम जप केला पाहिजे. देवाचे स्मरण केलं पाहिजे.
मंदिराच्या पायऱ्यांवर जप का करावा?
दर्शन घेताना, डोळे उघडे ठेवून परमेश्वराचे रूप अनुभवल्यानंतर . मंदिराच्या बाहेर पडल्यानंतर, पायऱ्यांवर बसून डोळे बंद करून परमेश्वराचे ध्यान करावे आणि मंत्रजाप करावा. ही पद्धत आपल्या शास्त्रांमध्ये आणि आपल्या वडीलधाऱ्यांकडून आलेली आहे. याचा उद्देश आपल्या जीवनात आरोग्य, दीर्घायुष्य आणि मानसिक शांती मिळते. ज्या भगवंताकडे आपण इतक सगळं मागतो त्याच्या मंदिरात आपण प्रार्थनेनंतर काही वेळ बसणं म्हणजे त्याचे धन्यवाद मानल्यासारखे आहे.
मंदीरात आपण भगंवाताकडे प्रार्थना करण्यासाठी येतो तेव्हा त्याच्यासाठी मनापसून काही सेकंद तरी कारणे गरजेचे असते आणि म्हणून ती काही सेकंद फक्त भगवांसाठी असतात, त्याला आठवण्यासाठी असतात असंही म्हटलं जातं. म्हणून भगवंताचे दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या पायऱ्यावर काही सेकंदा का होईना पण नक्की बसावं.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)