कुंभ राशीत चतुर्ग्रही योग निर्माण झाल्याने ‘या’ राशींना होणार दुर्मिळ युतीचा फायदा, जाणून घ्या

सूर्याने कुंभ राशीत प्रवेश केला आहे. दरम्यान शनिच्या या राशीत राहू, शुक्र आणि बुध हे अशुभ ग्रह आहेत. या चार ग्रहांच्या युतीमुळे चतुर्ग्रही योग निर्माण झाला आहे. या योगाचे परिणाम राशीनुसार वेगवेगळे असतील, परंतु या तीन राशीखाली जन्मलेल्यांसाठी हे खूप शुभ असेल. चला तर मग त्या कोणत्या तीन राशी आहेत ते आपण जाणून घेऊयात.

कुंभ राशीत चतुर्ग्रही योग निर्माण झाल्याने या राशींना होणार दुर्मिळ युतीचा फायदा, जाणून घ्या
zodiac signs
| Edited By: | Updated on: Feb 14, 2026 | 8:13 AM

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह हे वेळोवेळी एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करत असतात आणि या संक्रमणाचा फायदा काही राशींना होत असतो. तसेच या परिवर्तनाच्या दिवसांमध्ये, ग्रह इतर ग्रहांशी संयोग होऊन शुभ आणि अशुभ योग निर्माण करतात. हे शुभ आणि अशुभ योग सर्व 12 राशींच्या लोकांच्या जीवनावर परिणाम करतात. तर सुर्याचे कुंभ राशीत प्रवेश झाल्याने शनिदेवाची रास कुंभ राशीत चार ग्रहांची युती झाली आहे.

ग्रहांच्या युतीच्या प्रभावामुळे या राशीत चतुर्ग्रही योग निर्माण झाला आहे. आज सूर्य कुंभ राशीत प्रवेश करत आहे, त्यामुळे कुंभ संक्रांती साजरी केली जात आहे. दरम्यान शनिच्या या राशीत राहू, शुक्र आणि बुध हे अशुभ ग्रह आहेत. या चार ग्रहांच्या युतीमुळे चतुर्ग्रही योग निर्माण झाला आहे. या योगाचे परिणाम सर्व राशीच्या लोकांसाठी वेगवेगळे असतील, परंतु या तिन्ही राशीच्या लोकांसाठी ते खूप शुभ असेल. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या तीन राशींसाठी हा योग शुभ ठरणार आहे.

मेष रास

मेष राशीसाठी त्यांच्या कुंडलिच्या ११ व्या भावात उत्पन्नाचे घर चतुर्ग्रही योग तयार झाला आहे. यामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. जुन्या गुंतवणुकीमुळे अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमच्या कारकिर्दीत यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे.

मिथुन रास

सूर्य, शुक्र, राहू आणि बुध यांच्या युतीमुळे निर्माण होणारा चतुर्ग्रही योग मिथुन राशीच्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. या ग्रहाच्या परिवर्तनाच्या दिवसांमध्ये कुटुंबातील कोणत्याही मोठ्या चिंता दूर होऊ शकतात. जीवन सामान्य होऊ शकते आणि सकारात्मक बदल होऊ शकतात. ऑफिसमधील कामाचा ताण कमी होऊ शकतो आणि उत्पन्न वाढू शकते.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी चतुर्ग्रही योग खूप शुभ ठरू शकतो. या काळात वृश्चिक राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनात सुखसोयी आणि समृद्धी वाढू शकते. कामाच्या ठिकाणी नवीन ओळख मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना पगारात वाढ होऊ शकते. या काळात सामाजिक आदर वाढू शकतो.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)