AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या दिवशी घराच्या अंगणात लावा तुळशीचं रोपं, हमखास लक्ष्मीदेवीचा आशीर्वाद मिळेल

सनातन धर्मात पूजनीय असलेले तुळशीचे रोप घरात सुख आणि समृद्धी आणते. वास्तुनुसार कोणत्या दिवशी तुळशीचे रोपं घरातील अंगणात लावणे शुभ मानले जाते. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात.

या दिवशी घराच्या अंगणात लावा तुळशीचं रोपं, हमखास लक्ष्मीदेवीचा आशीर्वाद मिळेल
tulsi 1
| Edited By: | Updated on: Feb 18, 2026 | 10:41 PM
Share

हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला पूजनीय स्थान आणि महत्व आहे. धार्मिक श्रद्धेनुसार तुळशीची पूजा केल्याने घरात सुख-शांतीसह लक्ष्मीदेवीचा वास सदैव राहतो. वास्तुशास्त्रानुसार चुकीच्या दिवशी किंवा चुकीच्या दिशेने तुळस लावल्याने जीवनात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो आणि लक्ष्मी देवी नाराज होऊ शकते. तर आजच्य या लेखात तुळस लावण्यासाठी कोणता दिवस शुभ आहे ते आपण जाणून घेऊयात.

तुळशीचं रोपं कोणत्या दिवशी लावावे?

तुम्हाला जर घरी तुळस लावायची असेल तर गुरुवार हा शुभ दिवस मानला जातो कारण तो भगवान विष्णूंना समर्पित असतो. धार्मिक श्रद्धेनुसार गुरुवारी तुळस लावल्याने कुटुंबातील सदस्यांवर विश्वाचे रक्षक भगवान विष्णू यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. त्यामुळे घरात शांती आणि आनंद येतो.

याव्यतिरिक्त शुक्रवार हा तुळस लावण्यासाठी शुभ दिवस मानला जातो. या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करण्याची प्रथा आहे. धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी घरात तुळस लावल्याने आपल्याला आर्थिक अडचणींपासून मुक्तता मिळते आणि घरात लक्ष्मी मातेचं आगमन होते.

तसेच कार्तिक महिना देखील तुळस लावण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या महिन्यात तुळशीची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. म्हणूनच या महिन्यात तुळस लावल्याने शुभ फळं मिळतात आणि घरात आनंद येतो.

तुळशी कोणत्या दिशेला लावावी?

तुळशीचे रोप घराच्या उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावावे. वास्तुनुसार ही दिशा देवांचे निवासस्थान मानली जाते. म्हणून या दिशेला तुळस लावल्याने व्यक्तीच्या जीवनात शुभ फळे मिळण्यास सुरूवात होते.

याशिवाय, तुळशीचे रोप पूर्वेकडेही लावता येते.

एका गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे दक्षिण दिशेला तुळस लावू नये. ही दिशा यमाची दिशा मानली जाते. यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतात.

तुळशीचे नियम

  • चुकूनही तुळशीजवळ बूट, चप्पल किंवा झाडू ठेवू नये.
  • याशिवाय तुळशीच्या रोपाजवळील स्वच्छतेची विशेष काळजी घ्या.
  • दररोज सकाळी आणि संध्याकाळी झाडासमोर तुपाचा दिवा लावा.
  • खराब हातांनी तुळशीला स्पर्श करू नका.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?