पूजा करताना तुमच्या हातून ‘या’ चुका घडत नाहीत ना? जाणून घ्या काय घ्यायची खबरदारी

| Updated on: Jul 25, 2021 | 7:50 AM

सनातन परंपरेत आपल्या देवतेची उपासना करण्याची वेळ, ठिकाण आणि पद्धत देखील निश्चित करण्यात आलेली आहे. जर आपण आपल्या देवी-देवतांची विधीवत उपासना केली तर नक्कीच तुमची पूजा लवकरच यशस्वी होईल.

पूजा करताना तुमच्या हातून ‘या’ चुका घडत नाहीत ना? जाणून घ्या काय घ्यायची खबरदारी
घरातील दैनंदिन पूजेचे हे आहेत खास नियम
Follow us on

मुंबई : आपण सगळेच जण सकाळी अंघोळ केल्यावर आणि तिन्ही सांजेला देवाची पूजा करतो. परमेश्वराची आराधना अर्थात पूजा केल्याने आपले मन सदैव आनंदी राहते. सनातन परंपरेत आपल्या देवतेची उपासना करण्याची वेळ, ठिकाण आणि पद्धत देखील निश्चित करण्यात आलेली आहे. जर आपण आपल्या देवी-देवतांची विधीवत उपासना केली तर नक्कीच तुमची पूजा लवकरच यशस्वी होईल. (You don’t make this mistakes while performing pooja, know what to look for and tactics to help ease the way)

1. सर्वप्रथम आपल्याला शुद्ध शरीर आणि मनाने देवाची उपासना केली पाहिजे. म्हणजेच काय, स्नान करून, स्वच्छ कपडे घालून, शांत आणि शुद्ध मनाने उपासना करावी. पूजा करताना राग येऊ नये.

2. नेहमीच ठराविक वेळी आणि एका विशिष्ट ठिकाणी देवाची उपासना करण्याचा प्रयत्न करा. परमेश्वराची उपासना करण्यासाठी ब्रह्म मुहूर्ताचा काळ सर्वात शुभ मानला जातो. जर हे शक्य नसेल तर आपण आपल्या हिशोबाने एक निश्चित वेळ निश्चित करू शकता.

3. पूजेसाठी बनविलेले ठिकाण नेहमीच ईशान्य दिशेस असले पाहिजे. तसेच, पूजेच्या वेळी आपला चेहरा नेहमी ईशान्य, पूर्व किंवा उत्तर दिशेने असावा. आपण कधीही देवाकडे पाय किंवा पाठ करून बसू नये. हे लक्षात ठेवा की देवाचे घर कधीही शिडी किंवा शौचालयाच्या बाजूला बांधू नये.

4. पूजास्थळावर कमीत कमी देवतांची स्थापना करावी आणि दररोज त्यांची स्वच्छता करावी.

या गोष्टींचे पालन करण्यास कदापि विसरू नका

1. भगवान शिव, गणेश आणि भैरवजी यांच्या मूर्तींना तुळशी अर्पण करु नये.

2. गणपतीला प्रसन्न करणाऱ्या दुर्वांचा उपयोग देवी भगवतीच्या पूजेमध्ये करू नये.

3. पवित्र गंगेचे पाणी कधीही प्लास्टिक, लोखंड किंवा अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यामध्ये ठेवू नये. गंगेचे पाणी ठेवण्यासाठी तांब्याचे पात्र उत्तम मानले जाते.

4. भगवान सूर्यदेवाला कधीही शंखामार्फत अर्घ्य अर्पण करू नये.

5. विष्णुप्रिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळशीला कधीही आंघोळ केल्याशिवाय स्पर्श करू नये किंवा तुळशीची पाने तोडू नये.

6. पूजेमध्ये कधीही दिव्यापासून दुसरा दिवा लावू नये.

7. पूजाघरात कधीही तुटलेले, फुटलेले फोटो किंवा दिवंगत लोकांचे फोटो ठेवू नका.

8. पूजाघरात कधीही पैसे लपवून ठेवू नये. (You don’t make this mistakes while performing pooja, know what to look for and tactics to help ease the way)

इतर बातम्या

Kolhapur Flood : कोल्हापुरात पूरस्थिती; राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्वाचे रस्ते बंद, वाहतूक रोखली

वयाच्या 22 व्या वर्षी 11 मुलं, करोडो रुपयांची संपत्ती असलेल्या जोडीला हवे आहेत तब्बल 105 मुलं !