कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मालाड मधील डी मार्ट सील

मालाड येथील लिंक रोडवर स्थित 'डी मार्ट' स्टोअरमध्ये कोव्हिड-19 विषाणू संसर्ग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे.

कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मालाड मधील डी मार्ट सील

मुंबई : मालाड (पश्चिम) येथील लिंक रोडवर स्थित ‘डी मार्ट’ स्टोअरमध्ये कोव्हिड-19 विषाणू संसर्ग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे. मनपाच्या पी/उत्तर विभाग कार्यालयाने ही कारवाई करून सदर स्टोअर आज (24 जुलै 2021) सील केले आहे. संबंधित व्यवस्थापकाला नोटीस बजावून यासंदर्भात तीन दिवसात स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेशदेखील देण्यात आले आहेत. (Malad D Mart Seal by BMC for violating Corona Prevention Rules)

मुंबईसह संपूर्ण राज्यामध्ये कोव्हिड-19 विषाणू संसर्ग प्रतिबंधक उपाययोजना लागू आहेत. साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार या सर्व उपाय योजनांचे आणि निर्देशांचे पालन काटेकोरपणे करणे बंधनकारक आहे. या अनुषंगाने आज (24 जुलै 2021) तपासणी करीत असताना, मालाडमधील लिंक रोड स्थित डी मार्ट स्टोअरमध्ये उपाययोजनांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले.

डी मार्टच्या कर्मचाऱ्यांनी, विशेषतः बिल काउंटरवरील कर्मचाऱ्यांनी मास्क आणि हातमोजे यांचा वापर केलेला नसल्याचे आढळले. तसेच कर्मचारी आणि ग्राहक हे सर्व जण वावरत असताना सुरक्षित अंतराचे नियम पाळत नसल्याचेही निदर्शनास आले. एकाच वेळी ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी करून नियमांचा भंग केला. यास डी मार्ट व्यवस्थापन कारणीभूत ठरलेले आहे.

एकूणच, कोव्हिड-19 प्रतिबंधक नियमांचे योग्यरीत्या पालन होत नसल्याने सदर डी मार्ट व्यावसायिक आस्थापना पुढील आदेशापर्यंत बंद (सील) करण्यात आली आहे. तसेच डी मार्टच्या संबंधित व्यवस्थापकास नियम भंगबाबत नोटीस बजावून, परवाना रद्द का करण्यात येवू नये, याविषयी तीन दिवसात स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेशदेखील पी/उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी दिले आहेत.

इतर बातम्या

Breaking : लिफ्ट कोसळून 4 जणांचा मृत्यू, वरळीच्या हनुमान गल्लीतील धक्कादायक घटना

Taliye Landslide : तळीये गावाच्या पुनर्वसनाची जबाबदारी ‘म्हाडा’ने स्वीकारली, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हांडांची मोठी घोषणा

कागदपत्रांची चिंता करू नका, सर्वांना मदत करु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तळीये गावात, दरड दुर्घटनेची पाहणी

(Malad D Mart Seal by BMC for violating Corona Prevention Rules)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI