AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kolhapur Flood : कोल्हापुरात पूरस्थिती; राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्वाचे रस्ते बंद, वाहतूक रोखली

पुराचं पाणी राष्ट्रीय महामार्गावर आल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 शिरोली पुलाजवळ बंद करण्यात आला आहे. कोल्हापुरातून हायवेला जाणारे सर्व रस्तेही बंद झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय.

Kolhapur Flood : कोल्हापुरात पूरस्थिती; राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्वाचे रस्ते बंद, वाहतूक रोखली
कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद
| Edited By: | Updated on: Jul 24, 2021 | 10:35 PM
Share

कोल्हापूर : गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरलं आहे. पुराचं पाणी राष्ट्रीय महामार्गावर आल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 शिरोली पुलाजवळ बंद करण्यात आला आहे. कोल्हापुरातून हायवेला जाणारे सर्व रस्तेही बंद झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. पुरामुळे मुख्य मार्गच बंद करण्यात आल्यामुळे गाड्यांच्या मोठ्या रांगा लागल्याचं चित्रंही पाहायला मिळत आहे. (National Highway No. 4, 17 state highways in Kolhapur district, 55 district roads closed due to floods)

कोल्हापुरातून बाहेर जाणारे आणि शहरात येणारे रस्त्यांची स्थिती

कोल्हापूर ते रत्नागिरी – बंद आहे कोल्हापूर ते पुणे (NH4) – बंद आहे कोल्हापूर ते सांगली – बंद आहे कोल्हापूर ते बेळगाव (NH4) – बंद आहे कोल्हापूर ते सिंधुदुर्ग/गोवा – बंद आहे

कोल्हापूर जिल्ह्यांतर्गत रस्त्यांची स्थिती

कोल्हापूर ते हातकणंगले, जयसिंगपूर, इचलकरंजी, शिरोळ – बंद आहे कोल्हापूर ते गांधीनगर (उचगाव मार्गे) – चालू आहे कोल्हापूर ते कागल – चालू आहे कोल्हापूर ते गारगोटी दुधगंगा कारखानाजवळ – बंद आहे कोल्हापूर ते राधानगरी – बंद आहे कोल्हापूर ते गगनबावडा (दोनवडे, कळे, मांडुकली) याठिकाणी बंद आहे कोल्हापूर ते पन्हाळा, शाहूवाडी, आंबा – बंद आहे

पोलीस प्रशासनाचं आवाहन

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आवाहन केलं आहे की, अत्यावश्यक कामाशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये. तसंच अत्यावश्यक कामाच्या वेळीही रस्त्याची पूर्ण माहिती असल्याशिवाय कुणीही रोडवर जाऊ नये. रस्त्यांची माहिती घ्यावी, तसंच पोलीस प्रशासनामार्फत वाहतुकीच्या दृष्टीनं वरीलप्रमाणे रस्त्याची माहिती देण्यात येईल. तरी सर्व नागरिकांनी आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करावं.

बंद असलेल्या रस्त्यांची आजची आकडेवारी

राष्ट्रीय महामार्ग (NH4) – शिरोली पुलाजवळ पाण्यामुळे बंद

राज्य मार्ग – एकूण 25 पैकी 17 राज्य मार्ग पाण्याखाली असल्याने बंद, तर 15 पूल पाण्याखाली

प्रमुख जिल्हा मार्ग – एकूण 112 प्रमुख जिल्हा मार्गांपैकी 55 मार्ग पाण्याखाली असल्याने बंद, तर 32 पूल पाण्याखाली

संबंधित बातम्या :

कृष्णा नदीचं पाणी सांगलीत शिरलं, तर कोल्हापूरजवळ हायवे अजूनही बंद, 20 किमीची भलीमोठी रांग

पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती, मुंबईतील दूध पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता

National Highway No. 4, 17 state highways in Kolhapur district, 55 district roads closed due to floods

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...