Investment Return: अधिक ‘रिटर्न’ मिळण्यासाठी हे आहेत, गुंतवणूकीचे योग्य पर्याय!

| Updated on: Sep 22, 2022 | 1:21 PM

मे महिन्यात महागाई दर किंचित घसरून 7.04 टक्क्यांवर आला. दरम्यान, चलनवाढीचा दर अजूनही सलग पाचव्या महिन्यात रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank) 4 टक्के (+2/-2) च्या आदर्श पातळीपेक्षा वरच आहे.

Investment Return: अधिक ‘रिटर्न’ मिळण्यासाठी हे आहेत, गुंतवणूकीचे योग्य पर्याय!
Income Tax Return
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई : महागाईने (Inflation) भारतासह संपूर्ण जगच हादरले आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. वाढत्या महागाईमुळे, सामान्य माणसाच्या एकूण क्रयशक्तीवरही परिणाम झाला आहे. गुंतवणुकीवरील (Investment) रिटर्नही महागाईच्या दराप्रमाणे मिळत नाही. एप्रिल 2022 मध्ये देशातील किरकोळ महागाई 7.79 टक्के होती, जी आठ वर्षातील उच्चांकी आहे. मे महिन्यात महागाई दर किंचित घसरून 7.04 टक्क्यांवर आला. दरम्यान, चलनवाढीचा दर अजूनही सलग पाचव्या महिन्यात रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank) 4 टक्के (+2/-2) च्या आदर्श पातळीपेक्षा वरच आहे.

महागाईवर मात करणे म्हणजे काय?

महागाईवर मात करणे म्हणजे गुंतवणुकीवर परतावा म्हणजेच मिळत असलेले रिटर्न महागाई दरापेक्षा जास्त असतो. जर गुंतवणुकीतून मिळणाऱ्या परताव्यापेक्षा वस्तू आणि सेवांच्या किमतीत वाढ जास्त असेल, तर असा परतावा निरर्थक आहे म्हणजेच परतावा शून्य आहे.

भारतातील महागाईवर मात कशी करायची?

महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. येत्या 10 किंवा 20 वर्षात महागाईचा दर आजच्या तुलनेत खूप जास्त असेल हे उघड आहे. महागाईवर मात करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे अशा प्लॅनमध्ये गुंतवणूक करणे ज्यामध्ये महागाई दराच्या बरोबरीने किंवा त्याहून अधिक रिटर्न मिळण्याची शक्यता असते. छोट्या बचत योजनांमध्ये तेवढे रिटर्न देण्याची क्षमता नसते हे तज्ज्ञांचे मत आहे. गेल्या काही वर्षांत अल्पबचत योजनेचे व्याजदरही कमी झाले आहेत. अशा परिस्थितीत, शेअर बाजारामध्ये दीर्घकालीन आकर्षक परतावा देण्याची क्षमता आहे, जी महागाईवर मात करू शकते.

शेअर बाजारातील गुंतवणूक

शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे दोन मार्ग आहेत. तुम्ही थेट बाजारात गुंतवणूक करू शकता. मात्र, यासाठी तुम्हाला बाजाराचे ज्ञान असायला हवे. स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग सुविधा देणार्‍या अनेक साइट्स आहेत. 5Paisa.com हे असेच एक व्यासपीठ आहे जिथे तुम्ही सहज, सुरक्षितपणे आणि तुमच्या स्वतःच्या भाषेत व्यापार करू शकता. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही https://bit.ly/3RreGqO ला भेट देऊ शकता. दीर्घकालीन चलनवाढीच्या तुलनेत शेअर बाजाराने चांगले रिटर्न दिले आहेत. दरम्यान, अल्पावधीत काही अस्थिरता असू शकते. चांगला रीसर्च आणि लॉंगटर्म इन्वेस्टमेंट मध्ये, गुंतवणूक केल्यास, शेअर बाजारातून मिळणारे रिटर्न महागाईचा सामना करण्यास मदत करू शकते.

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक योग्य पर्याय

शेअर बाजारातील रीस्क बाबत तुम्ही सांशक असाल, तर इक्विटी म्युच्युअल फंडाचा मार्ग स्वीकारला जाऊ शकतो. SIP च्या माध्यमातून म्युच्युअल फंडात नियमितपणे गुंतवणूक करून मोठा फंड तयार केला जाऊ शकतो. म्युच्युअल फंड दीर्घकाळात अपेक्षेपेक्षा चांगे रिटर्न देऊ शकतात. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी योग्य फंडाची निवड करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही आर्थिक सल्लागाराचीही मदत घेऊ शकता. उच्च चलनवाढीचा सामना करण्यासाठी, दीर्घकालीन (सात वर्षे किंवा त्याहून अधिक) पोर्टफोलिओ तयार करा, ज्यामध्ये इक्विटीचे प्रमाण जास्त असेल.