Mutual fund investments : चुकीच्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्याचा फटका तुम्हालाही बसलाय? काळजी करू नका या टीप्स फॉलो करा फायद्यात राहाल

कोणत्याही फंडात (Mutual fund ) गुंतवणूक करण्यापूर्वी फंडाची क्‍वांटिटेटिव्ह आणि क्‍वालिटेटिव या दोन्ही वैशिष्टयांकडे लक्ष द्या, म्हणजे भविष्यात नुकसान होणार नाही.

Mutual fund investments : चुकीच्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्याचा फटका तुम्हालाही बसलाय? काळजी करू नका या टीप्स फॉलो करा फायद्यात राहाल
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 1:13 PM

शुभम गेल्या काही दिवसांपासून चिंतेत आहे. एका मित्राच्या सांगण्यावरून त्यानं एका म्युच्युअल फंडात (Mutual fund) गुंतवणूक (Investment) केलीये. या फंड हाऊसबाबत गेल्या काही दिवसांपासून वाईट बातम्या येत आहेत, एवढंच नव्हे तर काही फंड व्यवस्थापकांचं निलंबन देखील करण्यात आलंय. तसेच या फंडातून फारसा परतावा देखील मिळत नसल्याचं शुभमला लक्षात आलंय. आपली गुंतवणूक एका चुकीच्या फंडात (fund) अडकलीये असं त्याला वाटू लागलंय. म्युच्युअल फंडांसंदर्भात असा प्रकार घडणं काही नवीन नाही. माहितीचा अभाव असल्यामुळेच चुकीच्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली जाते. स्वत: कोणतंही संशोधन न करता शुभमनं त्याच्या मित्राच्या सांगण्यावरून गुंतवणूक केल्यामुळे त्याला आर्थिक फटका बसलाय. जर अशी चूक झाली तर काय करावे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच, चला तर जाणून घेऊयात चुकीच्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास काय करावे?

अशावेळी नेमकं काय करावं?

तुम्ही चुकीच्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली असल्यास तर पहिल्यांदा ही चूक कशामुळे झाली याचा विचार करा. उदाहरणार्थ मित्राच्या सांगण्यानुसार किंवा सगळे जण गुंतवणूक करतायेत त्यामुळे चूक झाली. एखादा फंड दीर्घकाळ चांगली कामगिरी करत नसल्यास गुंतवणूकदार घाबरतो. त्यामुळे एखाद्या फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी त्या फंडाचा उद्देश काय आहे हे समजून घ्या. त्यासाठी तुम्हाला विविध घटकांचा अभ्यास करावा लागतो. उदाहरणार्थ रोलिंग रिटर्न, रिस्क अडजेस्टेड रेशियो, फंड मॅनेजर आणि AMC चा ट्रॅक रेकॉर्ड अशा घटकांवर लक्ष द्यावे. त्यानंतर बाजारातील अशाचप्रकारच्या दुसऱ्या फंडाची तुलना करा. या सर्व घटकांचा विचार करून आपण जी स्कीम निवडली आहे ती योग्य आहे का ? दुसऱ्या स्कीम किंवा बेंचमार्क इन्डेक्सच्या तुलनेत खराब कामगिरी करत आहे का? हे पाहावं. आपण निवड केलेल्या फंडाची कामगिरी चांगली नसल्यास चांगल्या फंडाची निवड करावी.

चूक सुधारा

इक्विटी म्युच्युअल फंड हे आऊटपरफॉमर्स किंवा अंडरपरफॉमर्सच्या विविध कालखंडातून जातात. हे व्यवसायाचे चक्र आणि बाजारावर आधारित मॅक्रो फॅक्टरच्या बदलावर अवलंबून असते. एखादा फंडांचा योग्य होल्डींग पिरीयड आणि संभाव्य परतावा समजून घेणं खूप महत्वाचं आहे, अशी माहिती असोसिएशन ऑफ रजिस्‍टर्ड इनवेस्‍टमेंटचे लोवाई नवलखी यांनी दिलीये. समजा तुम्ही स्मॉलकॅप स्कीममध्ये गुंतवणूक केलीय. त्यानंतर बाजारात शॉर्ट टर्म करेक्शन होते, त्यामुळे स्मॉलकॅप कंपन्याच्या शेअर्समध्ये चढ उतार होतात. स्मॉलकॅप फंडाची कालमर्यादा पाच वर्षाची आहे. त्यामुळे बाजारातील चढ-उतारामुळे फंडातही चढ-उतार होत असल्यास तुम्ही फंडातून पैसे काढून घेतल्यास तुमचा निर्णय चुकीचा ठरतो. मात्र तुम्ही गुंतवणूक केलेला फंडाची कामगिरी वारंवार बेंचमार्कशी तुलना करताना खराब दिसून येते. त्यावेळी तुम्ही चूक सुधारण्यासाठी खराब कामगिरी करणाऱ्या फंडातून पैसे काढून चांगल्या फंडात गुंतवणूक करा.

हे सुद्धा वाचा

गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ?

कोणत्याही फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी फंडाची क्‍वांटिटेटिव्ह आणि क्‍वालिटेटिव या दोन्ही वैशिष्टयांकडे लक्ष द्या. क्‍वांटिटेटिव्ह व्हेरीएबल्स म्हणजे फंडांचे आधीचे प्रदर्शन कसे होते? क्‍वालिटेटिवचं वैशिष्ट्य म्हणजे फंड मॅनेजरची सक्षमता, गुंतवणुकीची पद्धत आणि सिस्टिम या गोष्टी ध्यानात ठेवाव्यात. कोणत्याही फंडाची निवड ही सर्व कडक पात्रतेच्या आधारावर करावी. जोखीम, गुंतवणुकीचा उद्देश, आणि आर्थिक लक्ष या आधारे फंडाची निवड करावी. एकूणच एखाद्या चुकीच्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यानं खूप मोठं नुकसान झालंय. तर अशावेळी कोणतीही भिड न बाळगता आर्थिक सल्लागाराची मदत घ्या. त्यामुळे भविष्यात तुमच्याकडून चूक होणार नाही.

Non Stop LIVE Update
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.