AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठमोठे गार केले…. वैभवपेक्षाही लहान वयात कमाल केली; 11 वर्षांच्या युकीनं आशियाई स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक

टीम इंडियाचा स्टार सर्वात कमाी वयाचा वैभव सूर्यवंशी सध्ये आतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून गाजतो आहे. पण आता त्याच्या वयापेक्षाही लहान एका भिडूने सर्वांचे लक्ष वेधले आहे. कोण आहे हा खेळाडू जाणून घेऊयात...

मोठमोठे गार केले.... वैभवपेक्षाही लहान वयात कमाल केली; 11 वर्षांच्या युकीनं आशियाई स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक
Yuki KuriharaImage Credit source: social media
| Updated on: Sep 26, 2026 | 6:04 PM
Share

आशियाई क्रीडा 2026 मध्ये जपानच्या युकी कुरिहारा याने ई-स्पोर्ट्स पुयो-पुयो चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तो फक्त 11वर्षाचा आहे. तो शाळेमध्ये शिकतो आहे. विषेश बाब म्हणजे त्याने विरोधी खेळाडूला 10-2 ने हरवलं आहे. त्याचवेळी सेमीफायनलमध्येही 10-1 च्या अंतराने विजय मिळवला आहे. या खेळामध्ये त्याला काही चॅलेंजच नाही, असं म्हटलं जात आहे. कारण की पूर्ण स्पर्धेदरम्यान त्याला कोणीही चॅलेंज देऊ शकलेलं नाही.

भारताचा वैभव सूर्यवंशी हा क्रिकेटच्या मैदानावर गाजतो आहे. तो सर्वात कमी वयाचा भारतीय क्रिकेटपटू आहे. असं असतानाही तो आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंशी स्पर्धा करतो आहे. तो मोठ्या खेळाडूंनाही मोठे फटके मारून गार करतो आहे. पण जपानचा युकी हा फक्त 11 वर्षांचा असून तो आशियाई स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकलाय. तो वैभवप्रमाणे मोठ्या वयाच्या खेळाडूंशी भिडत मैदानात नाही. पण ई-स्पोर्ट्स पुयो-पुयोचा नवा चॅम्पियन म्हणून उदयास नक्कीच आला आहे. हा खेळ संगणक किंवा खास कन्सोलवर खेळला जातो.

मी दिवसभर बसून गेम खेळतो…

युकी सध्या शाळेत आहे. तो अभ्यासासोबतच दिवसातील तब्बल आठ तास गेम खेळण्यात घालवतो. हाच त्याचा सराव आहे. तो या खेळात इतका पारंगत झाला आहे की संपूर्ण आशियाई क्रीडा स्पर्धेत कोणताही खेळाडू त्याला आव्हान देऊ शकलेला नाही. त्याने अंतिम सामना 10-2 अशा फरकाने, तर उपांत्य फेरीचा सामना 10-1 अशा फरकाने जिंकला. यावरून गट फेरीतील त्याच्या कल्पकतेची कल्पना येतेय.

त्यांच्या दुप्पट वयाच्या खेळाडूंना पूर्णपणे नेस्तनाबूत केले

अंतिम सामन्यात त्याने दक्षिण कोरियाच्या कांग डोंगशिनचा पराभव केला. उपांत्य फेरीत त्याने थायलंडच्या तनारक वोंगकिटिकुनचा पराभव केला. विशेष म्हणजे, तनारक वोंगकिटिकुन २८ वर्षांचा आहे, म्हणजेच तो युकीच्या वयाच्या अडीच पट आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या सर्वात तरुण खेळाडूची कोणतीही अधिकृत नोंद नसली तरी, युकीला सर्वात तरुण सुवर्णपदक विजेता मानले जाते, कारण यापूर्वी इतक्या लहान वयात कोणत्याही खेळाडूने पदक जिंकलेले नाही.

Follow Us
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल