AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs IRE: अर्धशतक करणारा अभिषेक शर्माच ठरला टीम इंडियाच्या पराभवाचा व्हिलन; कोणती एक मोठी चूक केली?

भारत आणि आयर्लंड यांच्यात रंगलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने अतिशय वाईट कामगिरी केली. भारतीय संघाकडून झालेल्या तीन मोठा चुकांच्या परिणाम सामना गमवावा लागला.

IND vs IRE: अर्धशतक करणारा अभिषेक शर्माच ठरला टीम इंडियाच्या पराभवाचा व्हिलन; कोणती एक मोठी चूक केली?
abhishek sharma
| Updated on: Jun 27, 2026 | 8:58 AM
Share

भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांची टी-20 मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेचा पहिला सामना काल पार पडला. या सामन्याचा निकाल पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यास सामन्याचे नाणेफेक तर भारतीय संघाने जिंकले पण सामना मात्र गमावला. प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला तर प्रथम फलंदाजी करताना आयर्लंड संघाने 182 धावा केल्या. भापरतीय संघाला मात्र 148 धावा करता आल्या आणि भारतीय संघाने सामना 34 धावांनी गमावला. आयर्लंडने टीम इंडियाला पूर्ण 20 षटके खेळू दिली नाहीत किंवा 150 धावा देखील करू दिल्या नाहीत. टीम इंडिया 18.5 षटकांत केवळ 148 धावांवर सर्वबाद झाली. भारतीय संघाने तीन चुकामुंळे सामना गमावला.

आयर्लंडच्या विजयात गोलंदाजांनी मोठी भूमिका बजावली. या सामन्यात भारताने प्रथम गोलंदाजी केली आणि पॉवरप्लेमध्ये केवळ 30 धावांत तीन गडी गमावले. असे असूनही, आयर्लंडने 182 धावा केल्या, जो बेलफास्टमधील या मैदानावरचा सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम आहे. हे घडले कारण टीम इंडियाने तीन झेल सोडले, त्यापैकी दोन झेल त्यांना महागात पडले.

भारतीय संघाने आपली पहिली चूक तिसऱ्या षटकात केली, जेव्हा शिवम दुबेने अर्शदीप सिंगचा झेल सोडला. चेंडू चौकारासाठी गेला. तो झेल टिम टेक्टरने घेतला, जो त्यावेळी केवळ चार धावांवर होता. पुढच्याच षटकात तो बाद झाला असला तरी, त्याने 13 धावा जोडून 17 धावांवर डाव संपवला. त्यानंतर सोडलेला झेल भारतासाठी सर्वात विनाशकारी ठरला. 11 व्या षटकात, अभिषेक शर्माने गॅरेथ डेलानीचा एक सोपा झेल सोडला, जो त्यावेळी फक्त 8 धावांवर होता. त्यानंतर डेलानीने प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर सलग तीन षटकार आणि एका चौकारासह 32 चेंडूंमध्ये 49 धावांची वेगवान खेळी केली.

13 व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरकडूनही अशीच चूक झाली, त्याने आयर्लंडचा कर्णधार लॉर्कन टकरचा झेल सोडला. हा झेल इतर दोन झेलांपेक्षा थोडा अधिक कठीण होता, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर तो अपेक्षितच होता. टकर फक्त 28 धावांवर होता. चेंडू सुंदरच्या हाताला लागून 4 धावा झाल्या. आयर्लंडच्या कर्णधाराने याचा फायदा उचलला आणि 50 धावा केल्या. यादरम्यान, त्याने आणि डेलानीने मिळून केवळ दोन षटकांत 46 धावा केल्या आणि सामन्याचे चित्रच पालटले. याचा अर्थ, एकूण 3 झेलांची किंमत भारतीय संघाला मोजावी लागली आणि त्यांनी केवळ 76 धावा दिल्या, जे त्यांच्या पराभवाचे कारण ठरले.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन्....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन् नितेश पवारांना....
नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर....
Nana Patekar Funeral : नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं..
MPSC Protest : MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं करण्याच्या दिल्या सूचना, मात्र रुपाली पाटील म्हणाल्या...
सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक...
Mallikarjun kharge : सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक, मत चोरीवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप
नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी....
Mamata Kulkarni on Nana Patekar : नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी यांनी नाना पाटेकरांच्या आठवणींना दिला उजाळा
दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
Delhi India Alliance Morcha : दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
नाना पाटेकरांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय...
नाना पाटेकरांचे हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय घडलं होतं? डॉक्टरांनी सर्व सांगितलं
विचार जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नानांच्या आठवणीने गडकरी भावुक...
Nitin Gadkari On Nana Patekar : विचार जसे जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नाना पाटेकरांच्या आठवणीने नितीन गडकरी भावुक, म्हणाले...