
आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तानात 14 सप्टेंबरला दुबईत महामुकाबला होणार आहे. या सामन्याची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहतायत. दोन्ही टीम्सनी या स्पर्धेत चांगली सुरुवात केली आहे. टीम इंडियाने UAE वर 9 विकेट राखून शानदार विजय मिळवला. तेच पाकिस्तानने ओमानला 93 धावांनी धूळ चारली. आता दोन्ही टीम्स विजयाचा हाच सिलसिला पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करतील. या दरम्यान टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्मा पाकिस्तानाचा स्पिनर सूफियान मुकीमचा गर्वहरण करण्यासाठी बेताब असेल. या दोन खेळाडूंमध्ये वर्षभरापूर्वी वाद झाला होता.
भारतीय टीमचा आक्रमक ओपनर अभिषेक शर्मा आणि पाकिस्तानचा डावखुरा फिरकी गोलंदाज सूफियान मुकीम यांच्यात मागच्यावर्षी इमर्जिंग टीम आशिया कप टुर्नामेंट दरम्यान वाद झाला होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला. इमर्जिंग टीम आशिया कपमध्ये इंडिया-ए आणि पाकिस्तान-ए टीम ग्रुप-बी मध्ये होती.
टीमला वेगवान सुरुवात दिली होती
19 ऑक्टोंबर 2024 रोजी अल अमीरात क्रिकेट ग्राऊंडवर दोन्ही टीम्स परस्पराविरुद्ध खेळण्यासाठी उतरल्या होत्या. या मॅचमध्ये टीम इंडियाकडून ओपनिंगला आलेल्या अभिषेक शर्माने प्रभसिमरन सिंहसोबत मिळून टीमला वेगवान सुरुवात दिली होती. दोघांनी 6 ओव्हरमध्ये 68 धावा केल्या होत्या. त्यानंतर 7 व्या ओव्हरमध्ये सूफियान मुकीम आला. त्या ओव्हरमध्ये मोठा फटका खेळण्याच्या नादात अभिषेकने आपला विकेट गमावलेला.
WATCH:
SUFIYAN MUQEEM ASKED ABHISHEK SHARMA TO LEAVE THE GROUND#INDvPAK #EmergingAsiaCup2024 pic.twitter.com/RJHOLCULYc— cricket (@ccricket713) October 19, 2024
अंपायर्सना मध्यस्थी करावी लागलेली
त्यानंतर सूफियान मुकीमने अभिषेकला पॅवेलियनकडे परतण्याचा इशारा केला. त्यावर अभिषेकने त्याला प्रत्युत्तर दिलेलं. दोघांमध्ये मैदानातच वादावादी झालेली. सूफियान आणि अभिषेकमध्ये वाढता वाद पाहून अंपायर्सना मध्यस्थी करावी लागलेली.
या मॅचमध्ये अभिषेक शर्माने 22 चेंडूत 35 धावा फटकावलेल्या. इंडिया ए ने पहिली बॅटिंग करताना 20 ओव्हर्समध्ये 8 विकेट गमावून 183 धावा केलेल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानी टीमने 20 ओव्हर्समध्ये 176 धावा केलेल्या. आता हे दोन्ही खेळाडू आशिया कपमध्ये 14 सप्टेंबरला आमने-सामने असतील. यामुळे सामन्याचा रोमांच अजून वाढेल.