सचिन नव्हे, कर्टनी एम्ब्रोस याने या फलंदाजाला ठरवले जगातला सर्वात कठीण फलंदाज !

Curtly Ambrose on toughest batter: वेस्टइंडीजच्या दिग्गज गोलंदाजापैकी एक असलेल्या कर्टनी एम्ब्रोस यांनी टेस्ट करिअरमध्ये ४०५ विकेट घेतल्या होत्या. एम्ब्रोसच्या गोलंदाजीपुढे भलेभले फलंदाज नांग्या टाकायचे..

सचिन नव्हे, कर्टनी एम्ब्रोस याने या फलंदाजाला ठरवले जगातला सर्वात कठीण फलंदाज !
Courtney Ambrose
| Updated on: Dec 28, 2025 | 10:58 PM

वेस्ट इंडिजचा घातक गोलंदाज कर्टनी एम्ब्रोस यांनी त्याच्या काळातील सर्वात घातक फलंदाजाबद्दल सांगितले आहे. कर्टनी यानी भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे नाव न घेता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यांना त्याच्या काळातील धोकादायक फलंदाज म्हटले आहे. वॉला गोलंदाजी करणे माझ्यासाठी एक आव्हान असायचे असे कर्टनी म्हणाला. जेव्हा निडर आणि ठाम निर्धाराची गोष्ट येते तेव्हा सर्वात मजबूत फलंदाज म्हणून स्टीव्ह वॉ होते. त्यांच्या विरोधात गोलंदाजी करणे कठीण होते. मी ज्यांच्या विरोधात गोलंदाजी केली त्यात सर्वात कठीण आव्हानात्मक स्टीव्ह वॉ होते.

steve waugh

कर्टनी एम्ब्रोस यांनी गोलंदाजात सर्वात खतरनाक गोलंदाजी पाकिस्तानच्या वासीम अक्रम यांची होती असे सांगितले. अक्रम जेव्हा पाहिजे तेव्हा बॉल स्विंग करु शकायचे. कोणत्याही विकेटवर त्यांच्या गोलंदाजीचा सामना करणे फलंदाजासाठी अवघड होते. अक्रम बद्दल बोलताना एम्ब्रोस यांनी म्हटले की, मी म्हणेल वासीम अक्रम, त्यांच्याजवळ पेस होता, जर त्यांना स्विंग करायचे असेल तर ते स्विंग करायचे. सीम करायचे असेल तर तेही करायचे. आणि तुम्हाला असे वाटायचे की त्यांच्या विरोधात खेळताना तुम्ही क्रीजवर सेटल होऊ शकणार नाही.

wasim akram

घातक गोलंदाजी

Curtly Ambrose यांनी गोलंदाजीत वेस्टइंडीजसाठी १९८८ मध्ये टेस्टमध्ये मॅचमध्ये डेब्यु केला होता. कर्टली एम्ब्रोस याने आपली शेवटची टेस्ट मॅच इंग्लंडच्या विरोधात साल २००० मध्ये खेळली होती. टेस्ट करियरमध्ये या खतरनाक गोलंदाजाने ९८ टेस्टमध्ये ४०५ विकेट घेतल्या तर वनडेत १७६ मॅचमध्ये एकूण २२५ विकेट घेण्यात यश मिळवले. एम्ब्रोस आणि कोर्टनी वॉल्श यांची तेज गोलंदाज जोडीला जगातील सर्वात खतरनाक जोडी म्हटले जाते.