आफ्रिदी आधी म्हणाला, काश्मीर पाकला झेपणार नाही, आता म्हणतो…

इस्लामाबाद: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्यानंतर घूमजाव केलं आहे. भारतीय माध्यमांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा आफ्रिदीने केला आहे. काश्मीरबाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी  आफ्रिदीने दोन ट्विट केले आहेत. शाहिद आफ्रिदी हा नेहमीच त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. सध्या अशाच एका वक्तव्यामुळे तो चर्चेत आहे. एरव्ही तमाम भारतीयांच्या शिव्या खाणाऱ्या शाहिद आफ्रिदीने, त्याचा काश्मीरबाबतच्या वक्तव्याने भारतीयांची […]

आफ्रिदी आधी म्हणाला, काश्मीर पाकला झेपणार नाही, आता म्हणतो...
| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

इस्लामाबाद: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्यानंतर घूमजाव केलं आहे. भारतीय माध्यमांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा आफ्रिदीने केला आहे. काश्मीरबाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी  आफ्रिदीने दोन ट्विट केले आहेत. शाहिद आफ्रिदी हा नेहमीच त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. सध्या अशाच एका वक्तव्यामुळे तो चर्चेत आहे. एरव्ही तमाम भारतीयांच्या शिव्या खाणाऱ्या शाहिद आफ्रिदीने, त्याचा काश्मीरबाबतच्या वक्तव्याने भारतीयांची वाहावा मिळवली. कारण त्याने पाकिस्तान सरकारला आधी पाकिस्तान सांभाळा, मग काश्मीर मागा, असा सल्ला दिला.

‘काश्मीरला सांभाळणे हे पाकिस्तानला जमणार नाही’, असं शाहिद आफ्रिदी एका पत्रकार परिषदेत म्हणाला. आफ्रिदीच्या या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या  व्हिडीओमध्ये आफ्रिदी म्हणतो की, “पाकिस्तानला त्यांचेच प्रांत सांभाळता येत नाहीत. मग काश्मीर काय सांभाळणार. काश्मीर हा मुद्दा नाही, तर तिथे जे लोक राहतात तो मुद्दा आहे. काश्मीर पाकिस्तानला नको, भारतालाही देऊ नका. काश्मीरला वेगळं राष्ट्र बनवा. त्यामुळे तिथे किमान माणुसकी तरी जिवंत राहिल. तिथे दररोज जाणारे जीव तरी वाचतील”

पाकिस्तान स्वत:च्याच लोकांना सांभाळू शकत नाही, तो काश्मीरला काय सांभाळणार. जे लोक तिथे जीव गमावत आहेत ते कुठल्याही धर्माचे असले तरी माणूस आहेत, त्रास सर्वांना होतो, असंही आफ्रिदीने नमूद केलं.

आपल्याच देशाच्याविरोधात काश्मीरसारख्या विषयावर विधान केल्याने, आता तो पाकिस्तानमध्ये अनेकांच्या निशाण्यावर आहे.

भारतीय मीडियाने चुकीचा अर्थ काढला : आफ्रिदी

दरम्यान, आफ्रिदीने काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्यानंतर पाकिस्तानात त्याच्यावर टीका होत आहे. त्यानंतर आफ्रिदीने सावध पवित्रा घेत, भारतीय माध्यमांनी आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचं ट्विट केलं. आफ्रिदीचा काश्मीरबाबतच्या वक्तव्याचा जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी त्याने दोन ट्विट केले आहेत.

आफ्रिद म्हणतो, “भारतीय माध्यमांनी माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढून विपर्यास केला. मला माझ्या देशाचा अभिमान आहे. शिवाय काश्मीरमधील जनतेबद्दल सहानुभूती आहे. त्यांना त्यांचे हक्क मिळायला हवेत. माणुसकी जिवंत राहायला हवी”

याशिवाय दुसऱ्या ट्विटमध्ये आफ्रिदी म्हणतो, “माझी क्लिप अर्धवट आणि संदर्भहीन आहे. मी काश्मीरबाबत आधी काय बोललो हे त्या क्लिपमध्ये नाहीच. काश्मीर हा न सुटलेला तिढा आहे. संयुक्त राष्ट्राच्या नियमाने हा तिढा सोडवायला हवा. माझ्यासह प्रत्येक पाकिस्तानी नागरिक काश्मिरी स्वातंत्र्याच्या बाजूने आहे. काश्मीर पाकिस्तानचाच आहे”.