Cricketer Reitrement : सेमीफायनलमधून OUT होताच ऑस्ट्रेलियाच्या एका मोठ्या खेळाडूची निवृत्तीची घोषणा

Cricketer Reitrement : ऑस्ट्रेलियाच काल चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आव्हान संपुष्टात आलं. ऑस्ट्रेलियाची घोडदौड टीम इंडियाने रोखली. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या एका मोठ्या खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे.

Cricketer Reitrement : सेमीफायनलमधून OUT होताच ऑस्ट्रेलियाच्या एका मोठ्या खेळाडूची निवृत्तीची घोषणा
india vs australia odi head to head
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 05, 2025 | 12:53 PM

ऑस्ट्रेलियाची टीम चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधून बाहेर गेली आहे. काल दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेल्या सेमीफायनल मॅचमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा चार विकेट राखून पराभव केला. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या एका मोठ्या खेळाडूने वनडेमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथने वनडे फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. स्टीव स्मिथ आता फक्त टेस्ट आणि T20 मध्ये खेळणार आहे. स्टीव स्मिथ जवळपास 15 वर्ष वनडे क्रिकेट खेळला. या दरम्यान त्याने ऑस्ट्रेलियाच नेतृत्व केलं. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाने त्याच्यावर विश्वास दाखवला होता.

35 वर्षाच्या स्टीव्ह स्मिथने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर आपल्या निर्णयाबद्दल टीमच्या सहकाऱ्यांना कळवलं. स्टीव स्मिथ निवृत्ती जाहीर करताना म्हणाला की, “हा शानदार प्रवास होता. मी प्रत्येक मिनिटाचा आनंद घेतला. खूप सारे अद्भुत क्षण आणि अद्भुत आठवणी आहेत. दोन वर्ल्ड कप जिंकण हे एक मोठ यश आहे” “अनेक शानदार सहकारी या प्रवासात सोबत होते. आता 2027 वनडे वर्ल्ड कपची तयारी करण्याची एक चांगली संधी आहे. म्हणून असं वाटतं की हीच योग्य वेळ आहे” असं स्टीव स्मिथने म्हटलं आहे.


स्टीव स्मिथ काय म्हणाला?

“टेस्ट क्रिकेट अजूनही प्राथमिकता आहे. मी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल, थंडीत वेस्ट इंडिज आणि मायदेशात इंग्लंड विरुद्ध खेळण्यासाठी उत्साहित आहे. मला अजूनही असं वाटतं की, टेस्ट आणि T20 मध्ये योगदान देण्यासाठी बरच काही करायचं आहे” असं स्टीव स्मिथ म्हणाला.

असं आहे स्टीव स्मिथच वनडे करियर

स्टीव स्मिथने वर्ष 2010 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये डेब्यु केला. या दरम्यान तो ऑस्ट्रेलियासाठी 170 वनडे सामने खेळला. वनडेमध्ये त्याने 43.28 च्या सरासरीने 5800 धावा केल्या. यात 35 अर्धशतक आणि 12 सेंच्युरी आहेत. टीम इंडियाविरुद्ध स्मिथची कामगिरी नेहमीच उजवी ठरली. तो भारताविरुद्ध 30 वनडे सामना खेळला. यात 53.19 च्या सरासरीने 1383 धावा केल्या. यात 7 अर्धशतक आणि 5 शतकं आहेत.