
कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार, विराट कोहलीने मोठं पाऊल उचललं. तो पत्नी अनुष्का शर्मा हिच्यासोबत उत्तर प्रदेशातील वृंदावन येथील कृष्णा नगरीत पोहोचला. मंगळवारी सकाळीच त्या दोघांनी वृदांवनमधील कुंज आश्रमात जाऊन प्रेमानंद महाराजांची भेट घेत त्यांच्याकडून आशीर्वाद घेतला. विराट आणि अनुष्का यांनी प्रेमानंद महाराजांशी सुमारे 15 मिनिटे खाजगीत चर्चा केली. त्यानंतर दोघेही केली कुंज आश्रमात 2 तास 20 मिनिटं होतं. मंगळवारी सकाळी 7.20 च्या सुमारास विराट-अनुष्का, हे इनोव्हा कारने वृंदावनला पोहोचले.
गुरूंकडून काय घेतला कानमंत्र ?
त्यानंतर त्यांनी प्रेमानंद महाराज यांची भेट घेतली. या भेटीनंतर विराट कोहली आणि अनुष्का सकाळी 9.40 वाजता वृंदावनहून परत निघाले. अतिशय गुप्तपणे पार पडलेल्या या भेटीदरम्यान विराट-अनुष्का मास्क घालून गाडीत बसले होते. प्रेमानंद महाराजांच्या आश्रमातून बाहेर पडल्यानंतर सुमारे अर्धा तासानंतर विराट आणि अनुष्का परतले. या काळात त्यांनी आश्रमातील कामं पाहिली आणि समजून घेतली. तेथून त्यांनी प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले, त्यानंतर ते दोघेही दिल्लीला रवाना झाले. विराट कोहली आणि अनुष्काच्या भेटीचा हा कार्यक्रम पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात आला होता. विराट कोहलीचा ही आश्रमातील तिसरी भेट होती.
#WATCH मथुरा, उत्तर प्रदेश: #ViratKohli और अनुष्का शर्मा उत्तर प्रदेश के वृंदावन पहुंचे। pic.twitter.com/qkcteEXHSy
— ANI_HindiNews (@AHindinews) May 13, 2025
तिसऱ्यांदा आश्रमात दिली भेट
सोमवारी विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा केल्यानंतर, विराट हा अनुष्कासोबत दुसऱ्या दिवशीच, मंगळवारी खाजगी टॅक्सीने वृंदावनला पोहोचला. ही त्यांची तिसरी भेट होती.यापूर्वी, विराट कोहली त्याच्या कुटुंबासह जानेवारी 2023 मध्ये पहिल्यांदाच संत प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात भेट देण्यासाठी गेला होता. त्यानंतर या वर्षी जानेवारी महिन्यात तो दुसऱ्यांदा इथे आला, तेव्हा त्यांची मुलं वामिका आणि अकायही सोबत होते. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची संत प्रेमानंद महाराजांवर गाढ श्रद्धा आहे.
समजून घेतलं आश्रमाचं कामकाज
मिळालेल्या माहितीनुसार, विराट कोहलीने प्रेमानंद महाराजांशी सुमारे 15 मिनिटे संवाद साधला आणि उर्वरित वेळेत त्यांनी आश्रमातील कामकाजाचे निरीक्षण केले. विराट अनुष्का शर्मासह सकाळी 7 वाजता प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात हित केली कुंज येथे पोहोचला. त्यानंतर, सुमारे 9.30 वाजता, ते पुन्हा इनोव्हा गाडीत बसले आणि परत गेले.