
ICC मेन्स टी20 वर्ल्ड कप 2026 जिंकणाऱ्या भारतीय टीमवर पैशांचा पाऊस सुरु झाला आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड बीसीसीआयने टीम इंडियासाठी बक्षिसाच्या रक्कमेची घोषणा केली आहे. टीम इंडियाने रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडवर 96 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाने आतापर्यंत तीनवेळा टी20 वर्ल्ड कप जिंकला आहे. अशी कामगिरी करणारी टीम इंडिया क्रिकेट विश्वातील एकमेव टीम आहे. टीम इंडियाच्या या दमदार प्रदर्शनानंतर बीसीसीआयकडून त्यांच्यासाठी काय घोषणा होते? त्यांना किती कोटींच पारितोषिक मिळणार? याची उत्सुक्ता होती. अखेर बीसीसीआयने आज त्या इनामी रक्कमेची घोषणा केली आहे.
बीसीसीआयकडून टी20 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाला 131 कोटी रुपये रोख रक्कमेच इनाम जाहीर करण्यात आलं आहे. बीसीसीआयकडून आज मंगळवारी ही घोषणा करण्यात आली. भारताने याआधी 2007 आणि 2024 साली टी20 वर्ल्ड कप जिंकला होता. याआधी इंग्लंड आणि वेस्ट इंडिजने प्रत्येकी दोन-दोनवेळा टी20 वर्ल्ड कप जिंकलाय.
अंतिम सामन्यातही तोच सिलसिला कायम
खरंतर या टुर्नामेंटमध्ये प्रत्येक सामन्यागणिक टीम इंडियाची कामगिरी सुधारत गेली. अपवाद फक्त सुपर-8 च्या पहिल्या सामन्याचा. तिथे दक्षिण आफ्रिकेकडून पराभव झाला. पण त्यानंतर प्रत्येक सामन्यात टीम इंडियाची कामगिरी उंचावत गेली. सुपर-8 च्या दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेला नमवलं. तिथे 250 प्लस धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर वेस्ट इंडिजने दिलेलं 195 धावांचं अवघड लक्ष्य पार केलं. त्यानंतर सेमीफायनलमध्ये पुन्हा इंग्लंड विरुद्ध 250 प्लस धावा केल्या. अंतिम सामन्यातही तोच सिलसिला कायम राखत न्यूझीलंडला विजयासाठी 256 धावांचं टार्गेट दिलं होतं.
🚨 News 🚨
BCCI announces a cash reward of INR 131 crore for #TeamIndia following their triumphant campaign in the ICC Men’s T20 World Cup 2026.
🔽 Details | #T20WorldCup | #MenInBlue https://t.co/eagTz1eOUb
— BCCI (@BCCI) March 10, 2026
त्याच्यामुळेच सूर्यकुमार यादवला हा वर्ल्ड कप उंचावता आला
अखेरच्या तिन्ही सामन्यात संजू सॅमसनने जबरदस्त खेळ दाखवला. वेस्ट इंडिज विरुद्ध 97, इंग्लंड विरुद्ध 89 आणि न्यूझीलंड विरुद्ध 89 धावांची खेळी केली. त्याच्यामुळेच सूर्यकुमार यादवला हा वर्ल्ड कप उंचावता आला. संजू सॅमसन प्लेयर ऑफ द सीरीज पुरस्काराचा मानकरी ठरला.