.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ: जडेजासारखा अष्टपैलू खेळाडू टीम इंडियात खेळताना दिसणार, न्यूझीलंड दौऱ्यात मिळाली संधी

हार्दीक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया न्यूझिलंड दौऱ्यावर गेली आहे.

IND vs NZ: जडेजासारखा अष्टपैलू खेळाडू टीम इंडियात खेळताना दिसणार, न्यूझीलंड दौऱ्यात मिळाली संधी
Team India
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Nov 14, 2022 | 9:32 AM
Share

मुंबई : विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) टीम इंडियाच्या (Team India) काही खेळाडूंनी खराब कामगिरी केली आहे. त्यामुळे खराब कामगिरी करणाऱ्यांना टीम काढून टाका अशी मागणी चाहत्यांनी बीसीसीआयकडे केली आहे. टीम इंडियामध्ये काही खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. त्यामध्ये विराट कोहली, सुर्यकुमार यादव आणि हार्दीक पांड्या (Hardik Pandhya) यांचा समावेश आहे. इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये हार्दीक पांड्याने स्फोटक फलंदाजी केली. त्यामुळे टीम इंडियाची धावसंख्या 168 झाली होती. टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर फॉर्ममध्ये नसलेल्या खेळाडूंवर जोरदार टीका झाली.

हार्दीक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया न्यूझिलंड दौऱ्यावर गेली आहे. युवा खेळाडू टीम इंडियाने न्यूझिलंड दौऱ्यावर पाठवले आहेत. त्यामुळे टीम इंडियाच्या कामगिरीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. वॉशिंगटन सुंदर (Washington Sundar) या खेळाडूला टीम इंडियामध्ये संधी देण्यात आली आहे. जडेजासारखा सारखी अष्टपैलू खेळी वॉशिंगटन सुंदर सुद्धा करु शकतो.

वॉशिंगटन सुंदर याने टीम इंडियासाठी तीनही फॉरमॅटमधील क्रिकेट खेळले आहे. 4 कसोटी सामन्यात त्याने 265 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर 6 विकेट सुद्धा घेतल्या आहेत. तसेच टीम इंडियासाठी 6 वनडे आणि 31 टी20 मॅच सुद्धा त्याने खेळल्या आहेत.

टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया

हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत, शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र, चहलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक

वनडे मालिकेसाठी टीम इंडिया

शिखर धवन, ऋषभ पंत, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर