‘लहानपणी बंद खोलीत मी…’, अनाया बांगरने केला मोठा खुलासा
अनाया बांगरने ब्रेस्ट ऑगमेंटेशन आणि ट्रेकियल शेव्ह सर्जरी केली आहे. यानंतर अनायाने मोठा खुलासा केला आहे, याबाबत माहिती जाणून घेऊयात.

भारताचे माजी क्रिकेट खेळाडू संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अनाया बांगरने ब्रेस्ट ऑगमेंटेशन आणि ट्रेकियल शेव्ह सर्जरी केली आहे. त्यापूर्वी तिने इंग्लंडमध्ये हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी आणि जेंडर अफर्मिंग सर्जरीद्वारे जेंडर बदलले होते. यानंतर आर्यन बांगरची ओळख अनाया बांगर अशी बनली आहे. आता अनायाने सोशय मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, यात अनायाने मोठा खुलासा केला आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.
अनाया बांगरचा मोठा खुलासा
अनाया बांगरने व्हिडिओमध्ये मोठा खुलासा करताना म्हटले की, ‘जेंडर बाबत मी लहानपणापासून जाणून घेत होते. जेव्हा मी 9 वर्षांची होते, तेव्हा मी माझ्या आईचे कपडे घेऊन माझ्या खोलीत जायचे आणि ते कपडे घालायचे. मला नेहमी स्वतःला आरशात मुलगी म्हणून पाहणे खूप आवडायचे. कारण मला मुलगी व्हायचे होते.’
पुढे बोलताना अनायाने धाकटा भाऊ अथर्वबाबतही माहिती दिली आहे. अनाया म्हणाली की, ‘मी जेंडर बदलाच्या टप्प्यातून जात असताना अथर्वला याबद्दल माहिती होते. तो फक्त 16 वर्षांचा आहे. त्याने मला सांगितले होते की, जेंडर बदलल्यानंतर आपले नाते नेहमीच बहीण भावाचे राहील. यामुळे मला धीर मिळाला.’ दरम्यान अनन्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
सुरुवातीला क्रिकेट खेळायची
अनायाचे वडील संजय बांगर हे भारतासाठी 12 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामने खेळलेले आहेत. तसेच ते बराच काळ भारतीय क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक देखील होते. त्यामुळे अनायाच्या घरात सुरुवातीपासून क्रिकेटचे वातावरण होते. त्यामुळे अनायानेही क्रिकेट खेळायला सुरुवात केली. ती मुंबईच्या अंडर-16 संघात खेळलेली आहे. तसेच लँकेशायरमधील स्थानिक क्लबसाठीही क्रिकेट खेळली आहे. तिने यशस्वी जयस्वाल, सरफराज खान आणि मुशीर खान या नामांकित खेळाडूंसोबत क्रिकेट खेळले आहे. मात्र आता ती क्रिकेटपासून दूर गेली आहे.
अनाया बांगरने इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत तिच्या शस्त्रक्रियेवर एक डॉक्यूमेंट्री बनवण्यात आली आहे, जी लवकरच प्रदर्शित होणार आहे अशी माहिती दिली आहे. ही डॉक्यूमेंट्री लवकरच तिच्या यूट्यूब चॅनलवर लाँच केली जाणार आहे. यात अनाया बांगरने तिची ओळख कशी मिळवली हे सांगितले आहे.
